अस्तित्वात नसलेल्या मोक्षासाठी दूषित दुर्गंधीत प्रयागराज मध्ये मोक्ष मिळतो.असे सांगणारे उत्तर प्रदेश आणि केंद्र सरकार,तेथे झालेली चेंगरा चेंगरी,अनेकांचे मृत्यू तोच मोक्ष आहे.असे सागून सरकारी चुकांवर पांघरुण घालणारे तथाकथित संतगण? ही भारताने स्वीकारलेली मनुस्मृतीच्या धर्माची मानसिक गुलामगिरी आहे.जो मोक्ष चार्वाक बुद्ध महावीर आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर आमच्या संविधानकाराणी नाकारला आहे.याच पद्धतीने छत्रपती शिवरायांच्या कर्तृत्वावर प्रश्न उपस्थित करणारे राहुल सोलापूरकर आणि आता लोकप्रिय छावा चित्रपटावर ब्राह्मण क्षत्रिय वाद उभे करणारे ब्राह्मण पाहिले की,भारतीय माणसाच्या मनावर सतत आघात निर्माण करणारे लोक हे लोकशाही विरोधी वातावरण निर्माण करीत आहेत.त्याद्वारे लोकांच्या खऱ्या प्रश्नावर दुर्लक्ष करीत आहेत.आपली छत्रपती शिवरायांच्या रयतेच्या स्वराज्य विचारधारे विरोधात जमीनदारी सरंजामी वृत्तीची भूमाफिया बिल्डर धार्जिणी राजवट,अधिक मजबुतीने राबवत आहेत.
देशात चालू असलेल्या या हिंदू मुस्लिम ब्राह्मण क्षत्रिय भांडणात शोषण हे स्त्री शूद्र अतिशूद्र अल्प संख्याक यांचे होत आहे. हे माझे निरीक्षण आहे.लोकांचे शेती घरे गावे व्यापार सुरक्षा स्त्री सन्मान हे विषय रयतेच्या स्वराज्याचे होते.ब्राह्मण मराठा वादात कुणीही विद्वान साहित्यिक छत्रपती शिवराय आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या रयतेच्या लोकन्यायी स्वराज्य प्रशासन न्याय याविषयी बोलत नाही.वर्तमान काळात पुण्यात आणि ठाणे जिल्ह्यात चाललेली गरीबांच्या घरावरील अतिक्रम कारवाई मध्ये चुकते कोणाचे ? हे पहायला राज्यकर्त्या ब्राह्मण मराठा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्य मंत्री एकनाथ शिंदे अजित दादा पवार यांना वेळ नाही.
दिल्ली महाराष्ट्रात साहित्य परिषदा घेणारे साहित्यिक यांना हा तुटणाऱ्या घरांचा प्रश्न समजत नाही? लोक कलांचा अभ्यास करणारे विद्वान आपली पंच तारांकित घरे वाडे मंदिरे निर्माण करणाऱ्या ओबीसी एससी एसटी अल्पसंख्याक गरिबाना,स्वतःची जमीन (राष्ट्र )आणि झोपडी सुद्धा द्यायला तयार नसतील? त्यावर एका शब्दाची चर्चा करीत नसतील ?तर हे कसले साहित्यिक? लोकशाहीत आज विरोधी पक्ष अस्तित्वात राहिला नाही.म्हणूनच हे फेसबुक वॉट्सप आणि वृत्तपत्रीय लेख लिहून येणाऱ्या महाराष्ट्र विधानसभेला (अधिवेशनाला) जागे करण्यासाठी लिखाण करावे लागते.प्रत्यक्ष जमिनीवरची घरे गावठाणे वाचविण्याची लढाई लढत असताना चार ओळी लिहिणे अवघड आहे.हे मी मनापासून मान्य करतो.महात्मा जोतिबा फुले सावित्री माई फुले,डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे सामान्य माणसापेक्षा का मोठे आहेत हे त्यांनी लिहिलेल्या प्रबोधनाच्या साहित्यातून समजते.म्हणूनच त्यांना माझे त्रिवार वंदन आहे.
छत्रपती शिवरायांनी भूमिहीन लोकांना अर्थात स्त्री शूद्र अती शूद्र ओबीसी एससी एसटी मुस्लिम यांनाही जमीन घरे गावठाणे नांगर बैल बियाणे, बिनव्याजी कर्ज दिले होते.हे विद्यमान महाराष्ट्र सरकार आणि नागरिकांना मी प्रथम सांगत आहे.नवीन गावे बसविणे नवे किल्ले बांधणे हे छत्रपतींचे कार्य कोणत्याही चित्रपटात दाखविले जात नाही.जसी आमच्यासाठी भाकरी बनविणारी आई चित्रपटाचा विषय नसतो.याच धर्तीवर आजचा प्रश्न आहे.
ग्रामपंचायतींना बांधकाम परवाने देण्याचे अधिक कार असतात का? ग्रामीण भागात ग्रामपंचायतीकडून बांधकामासाठी मंजुरी दिली जाते.परंतु न्यायालयीन आदेशांमुळे आता अशा परवानग्या धोक्यात आल्या आणि गरीब रयत मागास वर्गीय यांची घरेही.गाव गावठानाला अर्थात लोकांना राहण्यासाठी घरांची नैसर्गिक गरज आहे.जशी भुकेल्या प्राण्यांना अन्नाची,तहानलेल्या पशू पक्ष्यांना पाण्याची आणि आई वडीलांना मुलांची.घरे ही माणसांची नैसर्गिक गरज आहे.निवारा हा जगण्याच्या संविधानिक अधिकाराचा विषय आहे.तर त्याला मान्यता देण्याचा अधिकार ग्रामसभा ग्रामपंचायत यांना आहे.हेच विधान सभा लोकसभा या लोकशाहीच्या सभागृहांना न समजल्यामुळे ? मुंबई ठाणे रायगड पुणे येथील तुटणाऱ्या घरांचा प्रश्न निर्माण झाला आहे.तो मानव निर्मित लोकशाही विरोधी उच्चवर्णीय लोकांनी केला आहेच.परंतु त्यांना निवडून देणारी जनता, लोक,नागरिक तेव्हढेच जबाबदार आहेत.आदिवासी ग्रामसभा वनहक्क कायदा २००६ निर्माण करू शकते.मग गावठाण घर हक्क कायदा का नाही? या प्रश्नावर आम्ही सर्व आगरी कोळी,भंडारी कराडी,ईस्ट इंडियन,आदिवासी लोक २००५ ते २०२४ पर्यंत कुळ कायदा ते गावठाण हक्क कायदा असा संघर्ष लोकशाहीत उभा करीत आहोत.लोक सहकार्य करीत आहेत.सरकार मात्र झोपल्याचे सोंग करत आहे.
आपला पाठिंबा या आंदोलनास हवा आहे.
जय भारत.
