
अमित शहा यांच्या रायगड दौऱ्यादरम्यान यजमान म्हणून रायगडचे खासदार सुनिल तटकरे सुतारवाडी येथे जेवणाची सोय करण्यात आली होती सदर ठिकाणी हेलिपॅड उभारण्यात आले होते.निविदा महाड सां.बा.विभागाने काढली.अंदाजे किंमत 1 करोड 39 लाख एवढी….म्हणजे एका जेवणाचा खर्च एवढा काय गरज आहे…या अशा जेवणाची जर.आता या जेवणाचा खर्च सामान्याच्या खिशातून भाव वाढ करून काढतील हे सरकार..अजब गजब सरकार. एका जेवणाचा खर्च.एकीकडे वाड्या वस्त्यांवर रस्ते नसल्याने उपचाराअभावी नागरीक आपला जीव गमावत आहेत आणि दुसरीकडे देशाच्या गृहमंत्र्यांना एका वेळच्या जेवणासाठी यजमानांच्या घरी जेवयला जाण्यासाठी हेलिपॅडसाठी १ कोटी ३९लाख रूपये खर्च केला जात आहे? अमित शाहांना इतकीच भूक लागली होती तर मला तरी सांगायचं होतं मीच थेट रायगडावर पेण वरून जेवण घेवून गेले असते निदान इतका खर्च तरी वाचला असता..!
अमित शहाला विचारल इतक्या बडदास्तीसाठी लागणारा पैसा ‘बापाच्या घरचा आहे काय?. तर याचा पुण्यवान भक्तांना राग येणार नाही ना?. कारण भक्त अज्ञानी अंधभक्त आहेत. पण देशाचा चौथा जागृत खांब प्रेस मीडिया पत्रकारांचा चॅनल मीडिया,प्रिंट मीडिया जातभाई गोतावळा शांत होता.तेव्हा झोपला होता.आता सोशल मिडियामुळे हे प्रकरण आता बाहेर येत आहे.जनतेला समजत आहे.पण विचारकरा एकटा अमित शहा हुकूमशहा आहे काय?.स्थानिक खासदार,आमदार आणि जिल्हाधिकारी प्रशासनातील उच्च शिक्षित अधिकारी मानसिक,वैचारिक दुष्टया गुलाम नाही काय?.घटनाकारांनी तेव्हाच सांगितले होते की घटना किती ही चांगली असली तरी तिची अंमलबजावणी करणारे नालायक असले तर तुम्ही कोणाला दोष देणार ?.आज देशात सर्वच सरकारी यंत्रणा राज्य घटनेनुसार काम करतांना दिसत नाही. सर्वच मनुवादी विचाराचे वाहक बनून काम करतात. कारण संपूर्ण शासन यंत्रणेवर आर एस एस प्रणित कामगार संघटनेचे नियंत्रण आहे. मोदी शहा हे परदयावरचे अभिनेते आहेत. हे आम्ही समजून घेत नाही.ते समजून घेये पर्यन्त संपूर्ण देश गुलाम झालेला असेल.
सागर तायडे यांस कडून
