
भीमा कोरेगाव येथे पेशवाई विरोधात महारांनी केलेला १ जानेवारी १८१८ चा संघर्ष आज ही प्रेरणादायी लक्षवेधी आहे.२०१८ ला त्याला दोनशे वर्ष झाल्यानंतर राज्यात व केंद्रात पेशवाईचे वारसदार सत्ताधारी झाल्यावर त्यांना हा इतिहास नष्ट करण्याची खुमखुमी भरून आली होती.त्यासाठी त्यांनी मराठा ओबीसी तरुणांना हातीशी धरून भ्याड हल्ले केले होते. भीमा कोरेगाव इतिहास केवळ महाराष्ट्रातील आंबेडकरी विचारांच्या माणसांना माहिती होता.पण २०१८ नंतर देशातील नव्हे तर जगातील एकूण मानव जातीला माहिती झाला.ऐतिहासिक भीमा कोरेगाव विजयस्तंभालगतच्या जागेवर रखवालदार माळवदकर कुटुंबीयांनी केलेल्या अतिक्रमाविरूध्द रामदास लोखंडे यांनी प्रथमच दैनिक सम्राट चा प्रतिनिधी म्हणून दिनांक २३ डिसेंबर २००९ रोजी सम्राटच्या पहिल्या पानांवर ठळक बातमी प्रसिद्ध करून आंबेडकरी समाजात व प्रशासनात आवाज उठवला होता.या लढ्यात आंबेडकरी चळवळीचे लढाऊ नेते सुदामराव पवार बाबा यांचे प्रमुख मार्गदर्शन व सहकार्य होते.तसेच भीमा कोरेगाव विजयस्तंभ संरक्षण व संवर्धन समितीचे ते सल्लागार व ज्येष्ठ विश्वस्त होते..
भीमा कोरेगाव विजयस्तंभ संरक्षण व संवर्धन समितीचे ज्येष्ठ विश्वस्त आंबेडकरी चळवळीचे लढाऊ नेते सुदामराव पवार बाबा यांचे प्रमुख मार्गदर्शन व सहकार्यामुळे रामदास लोखंडे स्थानिक पदाधिकारी आणि दैनिक वृतरत्न सम्राट प्रतिनिधी यांच्यामुळे महाराष्ट्रातील खेड्या पड्यात ऐतिहासिक भीमा कोरेगाव विजयस्तंभा लगतच्या जागेवर रखवालदार माळवदकर कुटुंबीयांनी केलेल्या अतिक्रमाविरूध्द प्रचंड असंतोष उफाळून आला होता.बहुसंख्य संस्था संघटना आणि पक्ष कार्यकर्ते यांच्या कडे स्वताचा कोणताही कृती कार्यकर्म नसतो. राज्यात कुठे तरी अन्याय अत्याचार, पुतळा विटंबना झाली की स्थानिक तालुका जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना निषेध ,निदर्शन मोर्चे आंदोलन करण्याचा कार्यकर्म मिळतो.मग ऐतिहासिक भीमा कोरेगाव विजयस्तंभालगतच्या जागेवर रखवालदार माळवदकर कुटुंबीयांनी केलेल्या अतिक्रमा विरोधात जन आंदोलन राज्य भरात पेट घेत होते. त्याच जमिनी बाबतचा कोर्ट कचेरीचा सनदशीर मार्गाचे संघर्ष आदरणीय दादाभाऊ अभंग आणि रामदास लोखंडे आज ही लढत आहेत.सुदामराव पवार आणि मराठवाड्यातील आंबेडकर चवळीचे जेष्ठ नेते एन डी बाबा सोनवणे ही जवळचे मित्र होते.बाबासाहेबांच्या हाताखाली चळवळीत दुसऱ्या फळीतील नेते दादासाहेब रूपवते,आर डी भंडारे,बी सी कांबळे,यांच्या सोबत ग्रामीण भागात पहिल्या फळीचे नेते म्हणून एन डी बाबा, सुदामराव पवार आणि अकोला,बुलढाणा वाशिम,विदर्भ प्रदेश आणि मराठवाड्यातील अनेक लढाऊ कार्यकर्त्याची नेत्याची ओळख मला एन डी बाबा सोनवणे यांच्या मुळे झाली होती. ऐतिहासिक भीमा कोरेगाव विजयस्तंभालगतच्या जागेवर रखवालदार माळवदकर कुटुंबीयांनी केलेल्या अतिक्रमा विरोधात जन आंदोलन राज्य भरात पेट घेत होते.त्या वेळी एन डी बाबा यांनी मला भीमा कोरेगाव येथे जाऊन सुदामराव पवार यांची भेट घेण्याचे सांगितले.त्यांचा आदेश मानून मी १ जानेवारी च्या चार दिवस अगोदर भीमा कोरेगाव येथे गेलो होतो.त्यांचे राहण्याचे ठिकाण पेरणे फाटा,सणसवाडी काही माहिती नव्हते.भेटी नंतर स्थानिक राजकारण समाजकारण अनेक गंभीर विषयावर चर्चा झाली.जो इमानदारीने प्रामाणिकपणे समाज कार्यकरतो त्याला राजकीय लोक कार्यकर्ते नेते हमेशा शत्रू समजतात. आणि आंबेडकरी चळवळीचा आज पर्यंतचा इतिहास हा “भावाचा वैरी भाऊ कशी होईल येकी” असा आहे. असो…

आंबेडकर चवळीचे जेष्ठ मार्गदर्शक समाज भूषण सुदामराव पवार बाबा यांचे दुःखद निधन बातमी वाचली आणि मनाला चटका लागून गेला.सामाजिक बांधिलकी समजून काम करणारे खरे समाज सेवक शोधून ही सापडणार नाहीत.समाजाच्या मताची विक्री करून पोट भरणारे,भावनिक मेळावे घेऊन पैसा गोला करणारे समाजसेवक गल्ली बोळात मिळतात.राजकीय आशीर्वाद घेऊ स्वताला निष्टावंत आंबेडकरी विचारांचे सैनिक खूप दिसतात.परंतु डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारावर शंभर टक्के विश्वास ठेऊन काम करणारे आणि चालणारे बुद्धाच्या धम्माचे आचरण करून प्रत्येकक्ष जीवनात कुटुंबातील मुलामुलीना उच्च शिक्षण देऊन उच्चपदी नोकरी करणारे मूल मुली घडविण्याचे काम सुदामराव पवार आणि एन डी बाबा सोनवणे यांनी केल्याचे मी पाहिले आहे.सामाजिक बांधिलकी समजून काम करण्याचा वारसा सांगणारे अधिकारी कर्मचारी बोटावर मोजता येतील.पण बापाचा आणि बाबा चा वारसा सांगणारे दिसणार नाहीत.
बुद्धिस्ट मुव्हमेंट सेंटर संचालित नालंदा बुद्धविहार निर्माण मोठा आदर्श निर्माण करून ठेवला.या ठिकाणी दरवर्षी धम्मबांधव एक जानेवारी रोजी भीमा कोरेगाला जाताना येताना येथे उतरून चहापाणी नाश्ता घेऊन जातात.१ जानेवारी २०२४ ला सत्ते शिवाय परिवर्तन करून दाखवणारे न्यूज चॅनल भीम शाहीचे उद्घाटन भीमा कोरेगाव येथे अनेक मान्यवरांच्या उपस्थित केले होते.त्यावेळी अनेक लोकांच्या मुलाखती घेतल्या त्यात कर्नाटक आंध्रप्रदेश चे लोक होते. त्यात त्यांनी सांगितले एन डी बाबा का दोस्त पवार बाबा के उदर रहने का है. त्यांना पूर्ण हिन्दी मराठी येत नव्हती पण बाबासाहाब और बुद्धिस्ट मुव्हमेंट का बडा आदमी है. हम हरसाल आते है और नये लोगोको लते है.ही सुदाम राव पवार बाबाच्या कामाची निष्ठेने केलेल्या कामाची आठवण आहे.
1 जानेवारी 2018 भीमा कोरेगावच्या झालेल्या दंगलीच्या वेळी वयाची आणि तबेतीची काळजी न करता एकसारखे झगडत राहणारे समाजासाठी जीवाची परवा न करता धाऊन जाणारे आणि मार्गदर्शन करणारे पवार बाबा आम्ही जवळून पाहिले आहेत. सामाजिक बांधिलकी सांगणारे संस्कार त्याच्या कुटुंबात झाले आहेत.जे कार्य बाबांनी केले आहे त्याचा वारसा त्यांची मुलं नातवंडे करीत राहणार यात बिलकुल शंका नाही. कुटुंबातील सर्व माणसं सामाजिक बांधिलकी म्हणून समाजकार्यात धार्मिक कार्यात नेहमी भाग घेतात आणि जबाबदारी पार पडतात.

माझी ओळख नव्हती केवळ एन डी बाबा सोनवणे यांची ओळख सांगितल्यावर त्यांनी मन मोकळ्या पणे गप्पा केल्या चांगले वाईट अनुभव सांगितले. त्यांनी पत्नीला ताराबाई सुदामराव पवार यांना बोलावून ओळख करून दिली प्रथम चहा नसता घ्या नंतर जेवण करून जा हा शब्दातील जिव्हाळा आपुलकी एक दिवसात निर्माण होत नाही. तसे संस्कार पवार बाबा सारख्यांच्या घरात प्रथम पासून होत असतात.सुदामराव पवार बाबाच्या अनेक आठवणी दोन दिवसा पासून माझा पाठलाग करीत होत्या.त्या काळी लोक गरीब होते आणि आंबेडकरी चळवळ श्रीमंत होती.जीवाला जीव देणारे लोक होते.आता लोक श्रीमंत आहेत आणि आंबेडकरी चळवळ गटातटात विभागून अपंग झालेली आहे.त्यात जीव घेणारी स्पर्धा आपसात आहे. सुदामराव पवार बाबाच्या निधना नंतर काही मित्रांना कॉल करून विचारले ऐतिहासिक भीमा कोरेगाव विजयस्तंभालगतच्या जागेवर रखवालदार माळवदकर कुटुंबीयांनी केलेल्या अतिक्रमा विरोधातील संघर्ष कसा सुरू आहे.काहीने उत्तर दिले आम्ही शासन प्रशासनाच्या विरोधात न्यायालयीन संघर्ष करतो तर काही लोक शौर्य दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन नियोजन करत असतात. आप सात संघर्ष नाही दोघांचे ध्येय एकच आहेत.मार्ग वेगळे आहेत.या लढ्यात आंबेडकरी चळवळीचे लढाऊ नेते सुदामराव पवार बाबा यांचे प्रमुख मार्गदर्शन व सहकार्य होते.तसेच भीमा कोरेगाव विजयस्तंभ संरक्षण व संवर्धन समितीचे ते सल्लागार व ज्येष्ठ विश्वस्त होते.त्यांच्या निधनामुळे या लढ्यातील संघर्षाचा मार्गदर्शक हरपला. त्याच्या प्रेरणादायी लक्षवेधी कार्याला कोटी कोटी प्रणाम आणि त्यांना भावपूर्ण आदरांजली.
सागर रामभाऊ तायडे ९९२०४०३८५९,भांडुप,मुंबई.
