सांगली जिल्हा नोदणीकृत बांधकाम कामगार संघटना कृती समितीने एकजुटीने निवेदन दिले.

बातमी शेअर करा.

विशेष प्रतिनिधी इस्लामपूर :-  सांगली जिल्हा नोंदणीकृत बांधकाम कामगार संघटना कृती समिती व इतर सर्व बांधकाम कामगार कल्याणकारी संघटना प्रतिनिधि पदाधिकारी यांनी ईसलामपूर येथे बांधकाम कामगार नोंदणी सुविधा केन्द्र वालवा तालुका यांना आज सोमवार दिनांक 19/5/2025 रोजी खालील मागणी साठी निवेदन देणेत आले,बांधकाम कामगार यांचे बरेच दिवसापासून प्रलंबित असणारे नविन नोंदणी, नुतनिकरण अर्ज,लाभाचे अर्ज लवकरात लवकर निकालात काढा,तसेच हे बांधकाम कामगार नोंदणी अर्ज तालुका स्तरावर तपासणे साठी तपासणी अधिकारी नेमणेत यावा,वाळवा तालुका सुविधा केन्द्र मधील अधिकारी व कर्मचारी यांना बांधकाम कामगार विविध अर्ज तपासणी करणेचे अधिकार देणेत यावेत,मोबाइल नंबर बदलणे, पाल्याची नाव समावेश करणे,नाव दुरुसती करणे,बॅक पास बुक समावेश करणे,असे सर्व बदल करणे ही प्रक्रिया तालुका स्तरावर व्हावी,14/3/2024 पासून प्रलंबित असणारे सर्व बांधकाम कामगार यांचे अर्ज निकालात काढणेसाठी मार्च 2025 आदेश असतानाही तालुका सुविधा केन्द्र मधील अधिकारी व कर्मचारी यांनी आपले कर्तव्यात कसूर केला याची चौकशी व्हावी,त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी. खऱ्या बांधकाम कामगारांचे अर्ज मंजूर करतांना अनेक जातक अटी सांगितल्या जातात. आणि दलाला मार्फत बोगस बांधकाम कामगारांची नांव नोंदणी विनाविलंब केली जाते म्हणजेच यात दलाल कर्मचारी अधिकारी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करतात ही उघड आहे. खऱ्या बांधकाम कामगार यांचे पाल्याचे शैक्षणिक अर्जाची आपाइमेंट 2026 दिनांक देण्यात येते म्हणजेच तोवर बांधकाम कामगार अर्ज नुतनिकरण येणार नाही.म्हणजेच बांधकाम कामगार यांना आपला अर्ज नुतनिकरण साठी प्रलंबित असलयाने आपला शैक्षणिक लाभाचा अर्ज निकालात काढता येणार नाही.म्हणजेच बांधकाम कामगार यांचे लाभ मिळणे अशक्य आहे,अशा एक नाही अनेक मागणीसाठी सर्व बांधकाम कामगार प्रतिनिधि पदाधिकारी व कामगार यांनी एकजुटीने संबंधित अधिकारी यांना निवेदन दिले ,त्यात सर्व कामगार नेते मान.अहमद मुंडे,संदिप पाटोळे,पांडुरंग पाटील,याशिन फकीर,जितेन्द्र सुरयवंशी,सागर चव्हाण, लक्ष्मण डुके,सलिम सययद,संतोष मोहीते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

मान.अहमद मुंडे,9890825859,इस्लामपूर यांस कडून 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *