
विशेष प्रतिनधी मुंबई – जागतिक मानव तस्करी विरोधी दिवस : 30 जुलै 2025,च्या अनुषंगाने,मुंबई स्माईल्स संस्थेने, कॉलेज युवकांमध्ये मानवतस्करी या विषयावर जनजागृती व्हावी यासाठी मुंबई स्माईल्स संस्थने विविध कार्यक्रम मुंबई मध्ये आज आयोजित केले होते,महिला व बालकल्याण विभाग,मुंबई शहर,जिल्हा विधी सेवा प्राधिकरण,व मुंबई स्माईल्स संस्था ह्यांच्या संयुक्त विद्यमाने ३० जुलै २०२५,जागतिक मानवी तस्करी विरोधी दिन २०२५ निमित्ताने ठाकूर श्यामणारायन डिग्री कॉलेज, कांदिवली येथे विध्यार्थ्यांना मानव तस्करी वर जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन केले होते, युवकांनी मानव तस्करी थांबविण्यासाठी मुलांनी काही डॉक्यूमेंटरी,रीळ व पोस्टर compitition विविध कॉलेजमध्ये घेतल्या होत्या त्या मध्ये ठाकूर श्यामणारायन डिग्री कॉलेज,निर्मला मेमोरियल फौंडेशन कॉलेज,कांदिवली,हिंदुजा कॉलेज,मुंबई, शिवाजीराव जोंधळे कॉलेज ऑफ लॉ व रीसर्च,आसनगाव यांनी डोक्यूमेंटरी,रीळ व पोस्टर बनविले होते, त्याचा पारितोषिक वितरण सोहळा आयोजित केला होता,मान्यवरांनी मुलांना संबोधित केले व सांगितले की मानव तस्करीच्या जाळ्यात अडकू नका,वेगवेगळ्या मार्गाने ट्राफिकर तुम्हला शोधत असतात तुम्ही स्वतः ची व इतरांची मदत करा मुंबई समेल्स सारख्या NGO,पोलीस तुम्हाला नेहमी मदती साठी तत्पर आहेत.
ठाकूर श्यामनारायण पदवी महाविद्यालयामध्ये मानव तस्करी विरोधात आंतर-महाविद्यालयीन विविध स्पर्धाचे आयोजन.ठाकूर कॉलेजच्या DLLE व NSS विभागाने पटकावली सर्वाधिक पारितोषिके
ठाकूर श्यामनारायण पदवी महाविद्यालयाच्या आजीवन शिक्षण आणि विस्तार विभाग (DLLE) आणि राष्ट्रीय सेवा योजना (NSS) यांनी 30 जुलै रोजी मुंबई स्माईल एनजीओच्या सहकार्याने मानवी तस्करीबद्दल प्रभावी जनजागृती आणि पारितोषिक वितरण कार्यक्रम आयोजित केला. माननीय.स्वाती चव्हाण (माजी न्यायमूर्ती,उच्च न्यायालय),मान. शोभा शेलार (महिला व बाल विकास अधिकारी,मुंबई),मान. मुकुल चितळे (सचिव/न्यायाधीश,DLSA) ,मान. ऋषी देशपांडे (अभिनेता आणि दिग्दर्शक), श्री.चित्तरंजन कदम (निवृत्त HPCL कर्मचारी),ॲड.शबनम काझी,श्री.सागर दवे,सुश्री रोहिणी रसाळ,मुंबई स्माइल्स यावेळी अनेक पोलीस अधिकारीही सामील झाले.सर्व मान्यवरांचे ठाकूर महाविद्यालयातर्फे स्वागत करण्यात आले. डॉन बॉसको कॉलेज,निर्मला कॉलेज,हिंदुजा कॉलेज,जे जे स्कूल ऑफ फाईन आर्ट्स व शिवाजीराव जोंधळे कॉलेज अशा अनेक महाविद्यालयांचा सहभाग होता.विविध स्पर्धा मध्ये रील मेकिंग, पोस्टर मेकिंग आणि डॉक्युमेंटरी मेकिंग या स्पर्धा होत्या.या आंतर-महाविद्यालयीन स्पर्धा मध्ये प्रामुख्याने ठाकूर महाविद्यालयाला घवघवीत यश मिळाले.

माहितीपट : पहिले पारितोषिक – विधी पटेल (एसवायआयटी) – भाविका पाटील (एसवायआयटी) – अथर्व काडगावकर (एसवायआयटी).तिसरे पारितोषिक – अनंत मिश्रा
पोस्टर मेकिंग:पहिले पारितोषिक – शिफा काझी (FYDS).या कार्यक्रमाने मानव तस्करीबद्दल युवा वर्गामध्ये जागरूकता,विद्यार्थ्यांची सर्जनशीलता आणि सामाजिक जबाबदारीला एका शक्तिशाली आणि सहयोगी व्यासपीठाद्वारे प्रोत्साहन दिले.याप्रसंगी ठाकूर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जी.डी.गिरी यांनी प्रास्ताविक केले आणि या स्तुत्य उपक्रमांबद्दल सर्व आयोजकां चे व विद्यार्थी स्पर्धकांचे अभिनंदन केले. कार्यक्रमाला 250 हून अधिक विद्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ठाकूर कॉलेजच्या NSS विभागाचे कार्यक्रम अधिकारी डॉ.कुणाल ठाकूर, DLLE विभागाच्या समन्वयक शना शेख तसेच मुंबई Smiles NGO चे प्रोजेक्ट मॅनेजर अॅड.विकास गायकवाड आणि अनेक स्वयमसेवकांनी अथक परिश्रम घेतले.
कालिदास रोटे -७९७७१०१८१५,यांस कडून
