
श्रावण महिना हा सण उत्सवांचा आहे.कोकणातील भात पिकाची लावणी पूर्ण होऊन शेते गडद हिरवीगार होत आहेत. शेतकरी आनंदात आहेत.निसर्ग बहरलेला असताना कोकणी माणूसही त्यात नारळी पौर्णिमा साजरी करणारा आगरी कोळी “आनंदाचे डोही आनंद तरंग” या निसर्ग न्यायाने सुखी समाधानी आनंदी असणारच.नागपंचमी, दहीहंडी, गणेशोत्सव,गौरी,मातृपूजनाचे पिठोरी उत्सव यांचा मूळ आधार निसर्गच आहे.
तरीही यांना चमत्कारी देव देवता, नवस, पूजा कर्मकांडाचे स्वरूप आल्याने निसर्गातील मूळ “आनंद स्वरूप” आणि मानवी मन याचे नाते संपत चालले आहे.निसर्गात न्याय आहे.ब्राह्मणी आभासी धर्मात ते नाही.म्हणूनच मी प्रत्यक्ष लोकांत जाऊन जे अनुभव घेतो त्यावर लिहावे लागते.श्रावण सुखाची अनुभूती बहरलेल्या निसर्गात आहे.नवी मुंबई शहरात सिडको एमआयडीसी ने उभारलेल्या सिमेंटच्या जंगलात ती नाही.माणूस हा निसर्गाचा अविभाज्य भाग असताना सिडकोने एमआयडीसी च्या नियोजनकार इंजिनियर्सनी निसर्गाचे अस्तित्व का जपले नाही ?.याचे उत्तर देशाला द्यावेच लागेल.
निसर्गात डोंगर नद्या याप्रमाणे समुद्र ही आहे.नवी मुंबईच्या समुद्राचे आणि सागरपुत्र यांचे अस्तित्व सिडकोच्या विकासात संपले. शहरांचे एमआयडीसीचे प्रदूषित पाणी यांनी समुद्र नासवीला.श्रावणात अंगणात येणारे मुंऱ्या,खवली मासे बालपणातील जुने मित्र आम्ही गमावले.उंदीर हे सापाचे अन्न आहे.उंदीर धान्याची नासाडी करतो.त्यांच्यावर साप नियंत्रण ठेवतात.म्हणून साप हे शेतकऱ्यांचे मित्र असतात.असले निसर्ग तत्वद्न्यान नव्या शहरात कुणालाही अलीकडे समजत नाही.म्हणूनच कबुतरांचा न्याय उच्च न्यायालयात पोहचतो.परंतु विकासात उध्वस्त झालेल्या आगरी कोळी ओबीसी माणसाला सिडको एमआयडीसी मनपा यात अनधिकृत बांधकामे म्हणून तुटणारी घरे,गावठाणे,यात कुणी वाली राहिला नाही.
नवी मुंबईत मी १९९० ते २००५ पर्यंत शिक्षक म्हणून कार्यरत होतो.सिडको एमआयडीच्या विकासात येथे आगरी असूनही मला हक्काचा रोजगार आणि निवारा मिळू शकला नाही.मला जो अनुभव आला तो माझ्यासारख्या ओबीसी एससी एसटी या साऱ्यांनाच आला असेल?.२००६ नंतर मी ॲड.दत्ता पाटील यांच्या नेतृत्वात रिलायन्स च्या सेझ विरोधी आंदोलनात उतरलो.पुढे लोकनेते दि बा पाटील यांचे सिडको विरुद्ध आंदोलन प्रत्यक्ष अनुभवले.या साऱ्यांचा मूलाधार “जमीन मालकी हक्क” म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि आगरी नेते नारायण नागू पाटील यांचे खोत सावकार जमीनदार यांच्या विरोधी आगरी कोळी कराडी भंडारी कुणबी यांचे ऐतिहासिक आंदोलन समजून घेतले.आगरी समाज शेतकरी प्रबोधिनीची स्थापना करून,कुळ हक्क परिषद चिंचोटी अलिबाग येथे लावली.येथे महाराष्ट्राचे विरोधीपक्ष नेते ॲड.दत्ता पाटील,कॉमरेड विलास सोनवणे,माजी न्यायमूर्ती बी जी कोळसे पाटील हे महाराष्ट्रातील मान्यवर नेते उपस्थित होते.

चरी अलिबाग येथे विश्व विक्रमी शेतकरी संप होऊनही त्याच अलिबाग तालुक्यातील माझ्या चिंचोटी गावात आजही मेहता या मारवाड्याची सावकार म्हणून नावे सातबाऱ्यावर दिसतात.आमचे आगरी कोळी शेतकरी सातबाऱ्यावर कुळ आहेत.हीच परिस्थिती ठाणे रायगड मुंबई पालघर आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग या तळ कोकणात आहे.लोकनेते दि बा पाटील आणि दत्ता पाटील हे आमच्यासाठी रात्रंदिन आंदोलन करणारे नेते हे नारायण नागू पाटील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यानंतरचे दुसऱ्या फळीतले धडाडीचे नेते होते.परंतु जुन्या ब्राह्मण मराठा क्षत्रिय वैश्य सावकारांनी १९६० ते १९७० साली आणलेल्या जबरदस्तीच्या भूसंपादनात एमआयडीसी सिडको,पुढे २००५च्या सेझ आक्रमणात त्यांना सतत व्यस्त ठेवले होते.हे मला त्यांच्याशी केलेल्या चर्चेतून कळले.कुळ कायद्याचे प्रत्यक्ष गावा गावात जाऊन काम करणे, राजकीय संघर्षामुळे अवघड बनले होते.आपण पहात आहात सिडको साडे बारा टक्के पुनर्वसन धोरण प्रत्यक्ष शेती कसनार्या आगरी कोळी कराडी ओबीसी कुळांसाठी लोकनेते दि बा पाटील आणि पाच हुतात्मे,हजारो आंदोलकांच्या त्यागातून १९८४ साली रायगडात झालेला ऐतिहासिक कायदा आहे.याची वाट कुळ कायद्याचा अभ्यास सोडून दिलेल्या. आमच्या कोळी आगरी कराडी ओबीसी नेते,वकील,प्राध्यापक,साहित्यिक यांनी लावली.
सिडकोत सत्ताधारी असलेल्या नगर विकासमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सावकारी मराठा ब्राह्मण युतीने बिवलकर या ब्राह्मण सावकारास १००० कोटी रुपयांची जमीन पुनर्वसन म्हणून सिडकोने दिली.यावर लढणारा आगरी कोळी कराडी एकही राहिला नाही.ओबीसी म्हणून हा आमचा वर्तमानातील सर्वात मोठा पराभव आहे.दुसरीकडे सिडको गावठाणातली घरे अनधिकृत ठरवून दिवसा ढवळ्या पाडतेय.हजारो एकर सिडको संपादित जमीन सेझ साठी सरकार कडे रिकामी पडून असताना.सरकार म्हणतेय.आगरी कोळी सिडको प्रकल्प ग्रस्त लोकांना साडे बारा टक्के पुनर्वसन म्हणून देण्यासाठी जमीन शिल्लक नाही.जमीन चोर सिडको ही लांडगा आहे. हे माहीत असूनही आम्ही भित्रे ससे होऊन सिडको समोर आंदोलन करतोय.वाघा समोर गाय उभी केली? तर वाघ खाणारच..
हा निसर्ग न्याय समजून घ्यावा.अशी विनंती मी ओबीसींना करतोय.जमीन जंगल पाणी समुद्र,शिक्षण आरक्षण यात हजारो वर्षे आमचे हक्क खाणारे हिंस्र ब्राह्मण क्षत्रिय वैश्य असतील ?.तर ओबीसी आगरी कोळी कराडी भंडारी लोकांना निसर्ग न्यायाने आपले गुलाम नोकर याचक स्वभाव बदलावे लागतील.
हिंस्र प्राण्यांच्या कृतीचे मी येथे समर्थन करीत नाही.परंतु अत्याचारी शोषक लोकांसमोर नेहमी अफजल खान यांना भेटायला छत्रपती शिवराय गेले ती युद्धनीती नव्या लोकशाहीत अहिसंक पद्धतीने आमदार खासदार प्रशासन पोलिस न्यायव्यवस्था,मिडिया,जन आंदोलनात मानवी शहाणपण म्हणून ओबीसी बांधवांनी उपयोगात आणली पाहिजे.नवी मुंबई येथे आमच्या कवडीमोल भावाने सिडको एमआयडीसी सेझ यांनी घेतलेल्या जमिनी आता महाराष्ट्र सरकार बाजारात प्रति गुंठा “७ कोटी” रुपयांनी विकते.
मनुस्मृतीच्या नव्या वंशजांनी आमच्या मातृभूमीचा बाजार मांडला आहे.धारावी मुंबई अदानी लोढा लुटतोय.जोडीला फडणवीस शिंदे,पवार आहेत.यातील उच्चवर्णीय विरोध शूद्र ओबीसी ही जुनी लढाई आजही आहे.जमीन मालकी हक्क,मग तो एमआयडीसी सिडको सेझ नवी मुंबई विमानतळ नैना,कोळीवाडा गावठाण असो.कुणीही आगरी कोळी पैसे खर्च करायला तयार नाही.ही एक कार्यकर्ता म्हणून माझी ओबीसी समाजाकडे नम्र तक्रार आहे.श्रावणातील सणांमध्ये मुक्तपणे पैसे खर्च करणाऱ्या माझ्या ओबीसी बांधवांनी चिंतन केले तर दिसेल?.आपल्या घराखालील जागेची किंमत सात कोटी रुपये गुंठा असेल.एवढ्या घरासाठी देशातून येणारे इतर लोक तीन पिढ्या कर्ज फेडतात.तर नवी मुंबई,मुंबई,महामुंबई,रायगड,ठाणे,पालघर या पूर्वीच्या अपरान्त भूमीत,छत्रपती शिवरायांच्या राजधानी रायगडात लक्ष्मी,भवानी,एकवीरा,जिजाऊ,सावित्री ही सारी मातृसत्ताक लक्ष्मीची आपल्या आईची रूपे आहेत.रुपये पैसे यांच्यापेक्षा अमूल्य नाते आईचे असते.जमीन विकू नका.चोरांना अजिबात देऊ नका.लक्ष्मीमाता मूर्तीत नाही.ती आपल्या मातृभूमीत आहे.तिच्यासाठी जीवनाचा सत्याग्रह उभा करा.ज्या मातीत जन्मलो त्याच मातीत जायचे आहे.आमची मुक्ती आकाशात नाही.बुद्ध,चार्वाक,महावीर,फुले,आंबेडकर आणि लोकनेते दि बा पाटील यांनी जे सांगितले ते हेच निसर्ग सत्य आहे.
गे मायभू तुझे मी..
फेडीन पांग सारे.
आणीन आरतीला ..
हे सूर्य चंद्र तारे..
जय ओबीसी.राजाराम पाटील.८२८६०३१४६३.उरण जिल्हा रायगड.

