आदरणीय सागर तायडे एक विवेकी सत्यशोधक…

बातमी शेअर करा.

फुले शाहू आंबेडकर यांच्या विचाराचे खंद्दे पुरस्कर्ते स्वतंत्र मजदूर युनियनचे राज्य अध्यक्ष,सत्यशोधक कामगार संघटनेचे संस्थापक सदस्य,राज्यातील नोंदणीकृत ७४ कामगार संघटनेच्या स्वतंत्र कृती समिती म्हणजेच महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघटना स्वतंत्र कृती समितीचे अध्यक्ष,दैनिक मुक्तनायकचे स्तंभ लेखक,सहा दशकापासून ते वृत्तपत्रांमध्ये लिखाण करतात.साहित्यिक क्रांतिकारी विचारांच्या सागर लाटा लेख संग्रहाचे लेखक,आरक्षण लभार्थीनी शासनकर्ती जमात बनावे.हे कामगारांना त्यांच्या हक्क व अधिकाराची जाणीव करून देणारे त्याचे कामगार ट्रेड युनियन वरील ४८ पानाचे पुस्तक कामगारांना संविधानाचे महत्त्व पटवून देणारे आहे. तसेच असंघटित कष्टकरी कामगार त्यांच्यासाठी असणाऱ्या कल्याणकारी योजनांची माहिती देणे. कल्याणकारी योजना कामगाराच्या पदरात पाडून देण्यासाठी सतत झटणारे,नाका कामगारांच्या समस्या सोडवणे त्यांना व्यसनापासून परावर्तित करणे.विविध संघटना चालवणे प्रत्यक्षपणे कामगाराच्या संपर्कात राहून त्यांना मार्गदर्शन करणे. त्यांच्या समस्या जवळून हाताळणे.असे त्यांच्या कार्याचे स्वरूप आहे. 

  समाजाला दिशा देण्याचे कार्य करणारे परखड लेखक आहेत.निर्भीडपणे लिखाण करणारे लोक फार कमी असतात. त्यातलेच एक आदरणीय सागर तायडे सर वेळोवेळी चुकीच्या गोष्टीवर ते भाष्य करतात.कितीही मोठा व्यक्ती असेल राजकारणी असेल सत्ताधारी असेल तरी त्या व्यक्ती विषयी ते लिहितात बोलतात. अनेक वेळा त्यांचे लेख वाचताना मला त्याची प्रचिती आलेली आहे.ते सत्य आणि सत्यच मांडतात. देशाच्या सर्वोच्च पदावर असलेल्या राष्ट्रपतीना ही आतापर्यंत त्यांनी त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून दिलेली आहे.सरकारला तर त्यांनी अनेक वेळा धारेवर घेतलेले. एवढे मोठे व्यक्तिमत्व असूनही त्यांना कसलाही गर्व नाही अभिमान नाही. आमच्यासारख्या अनेक नवोदित लेखकांना ते मार्गदर्शन करतात.त्यांचे लेख प्रसिद्ध करून समाजात मान सन्मान प्रतिष्ठा मिळवून देण्याचे महान काम करतात. परखड व निर्भीड विचारामुळे ते महाराष्ट्रभर पोहोचले.बदल घडवून आणण्यासाठी सातत्याने कार्य करतात.साहित्यिक म्हणून ते योग्य भूमिका पार पाडतात. त्यांच्या प्रत्येक लेखातून ते करत असलेल्या कार्याची प्रचिती येते.समाजाशी असलेली त्यांची बांधिलकी लक्षात येते. फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराला त्यांनी प्रत्यक्ष कृतीत उतरवले.आपण शिकलो म्हणून आपले पहिले कर्तव्य आहे की तळागाळातील लोकांना मार्गदर्शन करणे त्यांना मदत करणे.अशी त्यांची विचारसरणी आहे.त्यामुळेच मी माझ्या मैत्रिणी त्यांच्याशी मैत्री भावनेने जोडल्या गेलो आहे.

  सध्या अशी परिस्थिती आहे की लेखक काय लिहितो याकडे कुणाचे फारसे लक्ष नसते परंतु तो आपल्या संघटनेचे कार्य करत असेल तरच तो विचार पेरला जातो.परंतु माझा अनुभव आदरणीय सागर तायडे सरांच्या बाबतीत तसा नव्हता त्यांनी मला लिखाणासाठी वेळोवेळी प्रोत्साहन दिले.माझ्या लेखांना महाराष्ट्रभर प्रसिद्धी आदरणीय सागर तायडे सरांमुळेच मिळाली आणि त्यांच्या लेखातूनच मी खूप प्रेरणा घेतली. सर या वयात ही सक्रियपणे लिहितात. संघटित असंघटीत कामगार संघटना व त्यांच्या कामगार चळवळीत सक्रिय राहून काम करतात.अगदी मनापासून बदल व्हावे त्यासाठी ते प्रयत्नशील असतात.मी लिहित राहणार अन्यायविरुद्ध ही त्यांची विचारसरणी प्रेरणादायी आहे.समाजात देशात खूप काही वाईट घडत आहे पण आपण एकटा माणूस काय बदल करणार असा विचार ते करत नाही. महात्मा फुले ही म्हणाले होते की समाजात खूप वाईट घडते तेव्हा काहीच न करता आपण स्वस्थ बसण्यापेक्षा काहीतरी चांगला बदल झाला पाहिजे यासाठी आपण कामाला लागले पाहिजे.महात्मा फुले सारखे सागर तायडे एक सत्यशोधक आहेत देशात समाजात जे जे वाईट आहे ते ते नष्ट करण्यासाठी ते रात्रंदिवस झटतात ही उल्लेखनीय बाब आहे. खरच आदरणीय सागर तायडे सर नावाप्रमाणेच सागरासारखे अथांग आहेत. खरंच मोठी माणसं कधी अहंकार करत नाहीत.इतरांनीही पुढे यावे असे त्यांना नेहमी वाटत असते.

  आदरणीय सागर तायडे सर यांचा सागर लाटा नावाचा लेखसंग्रह आहे.अतिशय परखडपणे त्यांनी विचार मांडले आहेत.एकदा एका ग्रुप वर असा मेसेज आला होता की तीन टक्के लोकच वर्तमानपत्र वाचतात.सामान्य लोकांपर्यंत हा विचार कसा जाईल आणि बदल कधी घडेल.तर मला असं वाटतं जे वाचतात ते वैचारिक असतात.संवेदनशील असतात साहित्यिक असतात.ज्यांना बदल व्हावा अशी तळमळ असते.अशा लोकांच्या वाचण्यात आदरणीय सागर तायडे सरांचे लेख आले तर नक्कीच बदल घडेल आणि बदल घडत आहे.त्यांची लेखणी धारदार असली तरी त्यात एक संवेदनशीलपणा आहे. इतरांबद्दलची तळमळ आहे काळजी आहे.प्रसंगी आई मुलाचे कान धरते. ते यासाठीच की मूल चांगलं घडलं पाहिजे वाढलं पाहिजे त्याच भावनेने सर लिखाण करतात. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी शिकलेल्या लोकांवर जो विश्वास दाखवला होता तो विश्वास आदरणीय सागर तायडे सरांनी पूर्ण केलेला आहे.सागर तायडे सरांप्रमाणे जर शिकलेल्या सुशिक्षित लोकांनी सत्यशोधकी विचाराची कास धरली. वैज्ञानिक दृष्टिकोन लोकांमध्ये रुजवण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच भारत देश महासत्ता झाल्याशिवाय राहणार नाही. 

  सागर लाटा हा लेखसंग्रह अतिशय सुंदर आहे.या लेखसंग्रहा मधून लेखकाने आपले परखड विचार प्रभावीपणे मांडलेले आहेत.लेखाचे शीर्षक तर अतिशय मनोवेधक आहे. याविषयी मी सविस्तर लिहिणार आहे.महात्मा फुलेंचे लिखाण जसे व्यवस्थेची चिरफाड करते तसेच तायडे सरांचे लिखाणही व्यवस्थेची चिरफाड करते. सत्यशोधिकी विचारांच्या आदरणीय तायडे सरांना ३ ऑक्टोबर ६४ व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..या दिवशी महापुरुषाच्या चरणी एवढीच प्रार्थना की त्यांना दीर्घायुष्य लाभावे व त्यांच्या हातून अशीच समाजाची सेवा घडावी.आमच्यासारख्या लेखक लेखिकांना परोपरीने मार्गदर्शन लाभावे.

लेखिका

श्रीम.मनीषा जाधव अंतरकर

saiantarkar@gmail.com 

7822828708, अंबड जिल्हा जालना.

माझ्या घरी अंबड जिल्हा जालना. सदिच्छा भेट दिली असता अंतरकर कुटुंबाच्या वतीने सागर तायडे यांचा सत्कार करताना.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *