“सत्तेच्या जवळ अहंकार पोटी दूर”

बातमी शेअर करा.

चंद्रपूर मध्ये मागील महिन्यात महानगर पालिकेच्या निवडणुका झाल्यात बऱ्याच नोक झोकी मध्ये आप आपल्या पद्धतीने उमेदवार निवडून ही काँग्रेस,आणि बीजेपीची आलीत त्यात प्रतिभा धानोरकर खासदार आणि विरोधी पक्ष नेता विजय वडेट्टीवार यांनी आप आपली माणसे निवडून आणण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावली. आणि त्यात 27 नगर सेवक निवडून देखील आलीत. ती विरोधी पक्ष नेता विजय वटडेट्टीवार ची किंवा खासदार प्रतिभा धानोरकर ची म्हणण्यापेक्षा ती काँग्रेस ची होती हे म्हणणे संयुक्तिक होईल. काँग्रेस ची जनविकास सेना सोबत युती असल्याने त्याकडे 30 हा आकडा होता. केवळ चार नगर सेवक ची गरज होती.नंदू नगरकर आणि दानव यांना तिकीट काँग्रेस नी नाकारल्या मुळे त्यानी अपक्ष निवडणूक लढविली आणि ते निवडून देखील आलेत.अर्थात त्याची वैयक्तिक अस्तिव होत. आणि ती काँग्रेस चे पूर्वीचे असल्यामुळे काँग्रेस च्या काही लोकांनी त्याला प्रथम पसंती दिली असावी म्हणजे त्याचे वैयक्तिक कार्य, जनतेची सहानुभूती, आणि काही काँग्रेस च्या लोकांचे प्रेम जिव्हाळा यामुळे ते निवडून आले. म्हणजे ती नाराज काँग्रेस चीच माणसे होती. नेत्याचे आदय कर्तव्य असते की आपला कोणताही व्यक्ती दुखावला जाऊ नये. आणि जर दुखावला गेला असेल तर त्याचा झालेला समज, गैरसमज दूर करणे हे नेत्याचे आदय कर्तव्य असते. काहींनी प्रयत्न केला असेल काहींनी केला नसेल पण त्यात मात्र विजय दादा आणि प्रतिभा ताई अयशस्वी ठरल्या. 

    या दोन्ही नेत्याच्या आपसातील शेवट पर्यंत असलेल्या वर्चस्व वादा मुळे यांना दुसऱ्या नगर सेवकां सोबत पाहिजे तशी साठ गाठ करता आली नाही. त्यामुळे उबाठा, वंचीत, आणि दोन काँग्रेस चीच पूर्वी असलेली आणि नाराज होऊन अपक्ष राहून निवडून आलेली माणसे, बी एस पी, एम आय एम या सोबत पाहिजे त्या प्रमाणात जमवून घेता आले नाही. या सर्व कारणाने चंद्रपूर येथील महापौर पद काँग्रेसच्या हातून निसटले हे नाकारता येत नाही.आणि या सर्व प्रकाराला नेत्यातील आपशी संघर्ष कारणीभूत असल्याचा चर्चेचा विषय संपूर्ण चंद्रपूर आणि महाराष्ट्र मध्ये झालेला आहे. दुसऱ्या बाजूला आमदार सुधीर मुनगंटीवार आणि आमदार किशोर जोरगेवार यांचेही तिकीट वाटपा पासून तर निवडून आप आपले समर्थक आल्या नंतर देखील मतभेद राहिलेले आपल्याला दिसले. त्याचाही खूप मोठा आपशी मतभेद दिसून आला पण देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांनी वेळीच हस्त क्षेप केला आणि सुधीर मुनगंटीवार आमदार याकडे जबाबदारी दिल्याचे सांगितले जाते. तसे सुधीर मुनगंटीवार माजी मंत्री राहिलेले आहेत. बीजेपी चे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पण होते सतत ते निवडून सहा वेळा आलेले आहेत. बोलण्यात माहीर आहेत. बुद्धी चातुर्य त्याच्यात आहे. त्यानी अगदी संदीप गिऱ्हे जिल्हा प्रमुख शिवसेना उबाठा यांच्या सोबत संपर्क साधला, त्याना विश्वास मध्ये घेतले. वंचीत आणि उबाठा मिळून निवडणूक लढल्यामुळे ते संदीप गिऱ्हे सोबतच असल्याची त्यानी खात्री करवून घेतली. अपक्ष यांना सोबत घेतले आणि महापौर बीजेपी चाच होणार अशी बातमी टाकून दिली आणि अक्षरशः संगीता खांडेकर ला महापौर बनविले. 

    इकडे काँग्रेस ही उबाठा आणि वंचीत आपल्या सोबतच असल्याचे त्यानी गृहीत धरले पाहिजे पण त्याना पाहिजे त्या प्रमाणात विश्वासामध्ये घेतले नाही. विजय दादा आणि प्रतिभा ताईचे शेवट पर्यंत आपशी मतभेद चालू होते. शेवटी मिटविण्यासाठी दिल्ली पर्यंत जावे लागले याचा फायदा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी छक्का मारून घेतला आणि तो बाजीगर झाला आणि महाराष्ट्र मध्ये चर्चेचा विषय ठरला. जनतेने काँग्रेसला कौल जरी जास्त दिला असला तरी त्याचा फायदा घेता येत नसेल, म्हणजे बाजीगर होता येत नसेल तर काय फायदा? शेवटी सत्ता महत्वाची आहे आणि ती आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर येथील महापौर देऊन आपल्या कडे खेचून आणली हे नाकारता येत नाही.

    बीजेपी कडे केवळ 24 नगर सेवक होते. खर तर सुधीर मुनगंटीवार आमदार हे अव्वल राजकारणी आहेत. विद्यार्थी दशेपासून त्यानी सुरु केलेला प्रवास हा जिल्हा, विदर्भ, महाराष्ट्र आणि देश पातळीवर दखल घेण्यासाठी बाध्य करणारा आहे असे म्हटले तर वावगे ठरू नये. त्यानी दैनिक महाविदर्भ चंद्रपूर मधेही संपादक म्हणून काम केल्यामुळे त्याना केव्हा कोणते स्टेटमेंट द्यायचे याची चांगली जाणीव आहे. विधानसभा मध्ये ही एखादा प्रश्न लावून धरण्यात ते माहीर आहेत त्यानी अनेक निधी खेचून आणला. त्यानी बोललेले होते ते म्हणजे मी विदर्भ राज्य करणारच? हे शिल्लक राहिलेले आहे. आणि बऱ्याच दिवसा पासून विदर्भवादीची अपेक्षा आहे की, विदर्भ राज्य व्हावे.आता जनतेची एकच इच्छा आहे की, विदर्भ राज्य झाले पाहिजे. अचानक आता विदर्भाचाच मुख्यमंत्री,सन्माननिय, देवेंद्र फडणवीस आहेत. आणि सुधीर भाऊ मुनगंटीवार आमदार साहेब प्रश्न निकाली काढण्यात माहीर आहेत. सत्तेत असणारा नेता सुधीर भाऊ विदर्भ राज्य निर्माण करेल या अपेक्षेत चंद्रपूर वाशीय आणि विदर्भातील जनता आहे. काही सत्तेच्या जवळ असतांना,अहंकार आणि अज्ञान पोटी सत्ता उपभोगता येत नाही. ते सत्तेपासून दूर जातात. हे मात्र निश्चित, जे चंद्रपूर मधील जनतेनी पाहिलेले आहे. ही बाब चंद्रपूर, विदर्भ, महाराष्ट्र आणि देशालाही लागू पडते. हे विशेष. 

अविनाश टिपले- 9970917389,चंद्रपूर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *