
विशेष प्रतिनिधी भांडुप- सेवार्पण प्रतिष्ठान,मुंबई व स्वायत महाराष्ट्र अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा गौरव दिन सोहळा २०२६ दरवर्षी प्रमाणे मोठ्या उत्साहात एक मार्च २०२६ रविवार रोजी सह्याद्री विद्यामंदिर भांडुप पश्चिम येथे पार पडला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री.मारुती मार्तंड म्हात्रे सर,संस्थापक अध्यक्ष अमरकोर विद्यालय, राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार विजेते,समाजसेवक या सोहळ्यात महाराष्ट्रातील विविध लोककलेचे दर्शन घडले. सांस्कृतिक कार्यक्रम जसे महाराष्ट्र गीत,भावगीते,लेझीम,पोवाडा,अभंग,भारुड,लावणी,तुंबडी छत्रपती शिवरायांची शोर्य गाथा,साहित्यिकांचा गुणगौरव,मान्यवरांचा सन्मान व निबंध स्पर्धा पारोतोषिक वितरण अशा सुंदर नियोजन सांस्कृतिक कार्यक्रमामुळे मराठी भाषेला मानवंदना दिली गेली.
ज्येष्ट कवी साहित्यिक लक्ष्मण देठे म्हणजे कर्तुत्ववान आणि निस्वार्थी साहित्यसेवेच्या माध्यमातून समाजाची भावभावना,अनुभव व संवेदनांना आपल्या लेखणीतून समाजाला देणारे कवी साहित्यिक आहेत. सामाजिक बांधिलकी ठेऊन त्यांनी विचाराची प्रेरणा आणि भाव स्पर्शी करणाऱ्या शब्दात कविता त्यांनी लिहून त्यांचे लोकप्रिय गीते झाली आहेत. त्यांनी लिहलेल्या कविता गीत म्हणून सादर केल्यामुळे अनेक रुपेश गौतम अनिल नावा रूपाला आले आहेत. त्यांच्या सातत्यापूर्ण साहित्यनिर्मितीमुळे आणि संवेदनशील लेखनशैलीमुळे त्यांना सेवार्पण प्रतिष्ठान मुंबई तर्फ सन्मान चिन्ह शाल आणि सन्मानपत्र “सेवार्पण भांडुपरत्न गौरव पुरस्कार” प्रधान करण्यात आला.

या सेवार्पण प्रतिष्ठान द्वारे अशाच प्रकारचे वेगवेगळे मराठी संस्कृती जपणारे कार्यक्रम साजरे केले जातात. महाराष्ट्रातील संस्कृती व लोककलेचा पुढच्या पिढीपर्यंत प्रसार करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असे संस्थे तर्फेॲड.सुनिल दगडु साळुंखे संस्थापक अध्यक्ष-सेवार्पण प्रतिष्ठान मुंबई यांनी संगीतले.यावेळी सन्माननीय डॉ.राम शिंदे,संस्थेचे कार्यकारी मंडळ ॲड.सुनिल दगडु साळुंखे (अध्यक्ष),श्री.योगेश चिमाजी थोरात (सचिव) डॉ.शर्मिला आनंद जाधव (खजिनदार),ॲड.भक्ति विजय भाटे (सहसचिव),श्री.मनोज प्रभाकर बागवे (सहखजिनदार) सदस्यःश्री.दत्तात्रय विठ्ठल मांढरे,श्री.सुनिल दगडू पवार,. ॲड.श्रीकांत सुबूराव शिंदे,श्री.राजेंद्र जगन्नाथ पाटील,श्री.रवि चंद्रकांत घाडी,श्री.दयानंद जगन्नाथ सोनताटे,श्री.कृष्णा भीमराव पाटील मो.श्री.सचिन लक्ष्मण निवळे.अन्य मान्यवर उपस्थित होते.महाराष्ट्र अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी गौरव दिन सोहळ्याची सांगता पसायदानाने झाली. या कार्यक्रमात भांडुप येथील शाळा,कलाकार,साहित्यिक, राजकारणी पालक,शिक्षक यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.

सागर रामभाऊ तायडे यांस कडून
