संपत्तीसाठी नात्यामधील माणुसकी हरवली!

बातमी शेअर करा.

 मानवी जीवनात संपत्ती,पैसा हेच सर्वस्व नसून आपली माणसं आणि नातेसंबंध सुद्धा महत्वाचे असतात.नियत चांगली असेल तर मूलभूत गरजा भागविण्यासाठी जीवन पद्धती चांगल्या पद्धतीने जगता येईल.थोड्याशा संपत्तीसाठी माझ्या घरातील माणसांची नियत बदलली आमची वडिलोपार्जित पाच एकर शेतजमीन होती संपत्तीच्या अर्थात दोन अडीच एकर शेतजमीन हडपण्यासाठी माझ्या रक्तातील नात्याला म्हणजे सख्या भावाचे पवित्र नात्याला गढूळ करण्याचा नालायकपणा माझ्या स्वतःच्या घरात घडलेला आहे.नात्यापेक्षा संपत्ती हेच सर्वस्व मानणारे सुध्दा मला बघायला मिळाले आहेत.माझ्या वडिलांच्या मृत्यूनंतर अनेक वर्षांनी माझ्या सख्या काकांनी चुलत भाऊ आणि चुलत भावाच्या सासऱ्याच्या मदतीने खोटे दस्तऐवज मृत्यूपत्र सासऱ्याच्या गावात म्हणजे बाह्य जिल्ह्यात नोंदणीकृत करून माझ्या हिस्स्याची शेतजमीन हडपण्याचा केविलवाणा प्रयत्न केला होता.

   मला या प्रकरणाची माहिती मिळताच मी संबंधित कार्यालया कडून दस्तऐवजाची नक्कल आणून त्यांचा तो लबाड कावेबाज डाव हाणून पाडला नंतर रक्ताचे नातेसंबंध गढूळ करणाऱ्या नैतिकता,नीतिमत्ता, प्रामाणिकतेला तिलांजली देणाऱ्या माझा विश्वासघात करून पाठीत खंजीर खूपसणाऱ्या संपत्तीसाठी नात्यात कटुता निर्माण करणाऱ्या मानवतावादी धर्म आणि माणुसकीला लाथाडणाऱ्या वाईट प्रवृत्ती असलेल्या धोकेबाज लोकांसमवेत उर्वरित आयुष्य काढणे माझ्यासाठी आणि माझ्या मुलांसाठी योग्य ठरणार नाही असा दूरदृष्टीने विचार करून त्याचवेळी नात्यामध्ये विश्वास नसल्याने आणि विश्वासघात करणारे नातेवाईकांपासून अलिप्त राहावे याचा विचार करून मला नाईलाजाने इच्छा नसतांना सुद्धा भाऊबंदकी आणि नातेसंबंध तोडावे लागले भविष्यात वादविवाद टाळण्याचा मी प्रयत्न केला.

   माझ्या हिस्स्याची शेतजमीन हडप करण्यासाठी खोटा दस्तऐवज तयार केल्याची कबुली जवळच्या नातेवाईकांसमोर दिल्या नंतर मी माझ्या हिस्स्याची शेतजमीन कवडीमोल भावात विक्री केली आहे.या प्रकरणाशी संबंधित कायदेशीर पुरावे माझ्या कडे उपलब्ध आहेत.थोड्याशा संपत्तीसाठी रक्ताचे नातेसंबंध,माणुसकीला आणि मानवतावादी धर्माला विसरून नातेसंबंध गढूळ करणारे जवळचे नातेसंबंध विसरलेले सुद्धा माझ्याच आजूबाजूला दडलेले होते.सत्य परिस्थिती आहे आपलीच रक्तातील नात्यातील जवळची माणसं संपत्तीसाठी किती खालच्या थराला जाऊ शकतात किती क्रूर पध्दतीने वागू शकतात याचा अनुभव आला आहे.नातेसंबंध,भाऊबंदकी,सगेसोयरे यापेक्षा थोड्याशा संपत्तीला महत्व देणारी माणसं बघायला मिळाली.आयुष्यभर मनात एक खंत राहील कि,थोड्याशा संपत्तीसाठी नात्यामधील माणुसकी सुध्दा हरवली.

 प्रमोद सूर्यवंशी :-8605569521.

चिखली मातृतीर्थ बुलडाणा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *