सुनिल येवले..बांधकाम मजुर बोर्डाचा कल्पक निर्माता!

बातमी शेअर करा.

लेनिनच्या चेह-यावरील प्रगल्भता मला सुनिल येवलेंच्या चेह-यावर दिसते.कडक ऊन्हात तहान लागली म्हणुन ऊसाचा रस पिण्यासाठी लेनिन थांबलेले.फीरणा-या चरख्यात पिळणारा ऊस पाहुन लेनिन व्यथित झाले. या चरख्यात पिळणा-या ऊसा सारखा माझा कामगार पिळल्या जातोय हा विचार येता क्षणी लेनिनने रसाचे पैसे ठेवले व रस न पिता ते निघुन गेले.अशीच तळमळ मला सुनिल येवलेंच्या शब्दात नेहमी दलित कामगार वर्गाबाबत दिसते.नाका कामगार असो की घरकामगार करणारी भगिनी असो येवलेच्या चेह-यावर नेहमी त्याच्या बद्दलची आस्था मला दिसली.  नाक्यावरचा कामगार येवलेना जेव्हा भेटतो तेव्हा स्वताकडे पैसे असो नसो येवले त्या कामगाराला तु वडापाव खाणार का हे पहील्यादा विचारतात मग पुढची चर्चा करतात.असे हे सुनिल येवले चेम्बुर गोवंडी विभागातील लोकप्रिय असे नेते आहेत.गेली ३० वर्ष ते सामाजिक क्षेत्रात प्रामाणिकपणे न थकता कार्यरत आहेत.संध्याकाळीची वेळ होती.सुनिल येवलेना भेटायला मी शिवाजी नगरला गेलो होतो.बहुसंख्य मुस्लिम असलेला असा हा विभाग! येवले मला त्याच्या इमारतीच्या गेटवर भेटले.बोलत चालत आम्ही त्याच्या पार्टी आँफीसकडे चाललो होता.खर पाहील तर घरापासुन पार्टी आँफीस पंधरा-वीस मिनिटांच्या अंतरावर आहे तरी घरापासुन कार्यलयापर्यन्त पोहचायला आम्हाला एक तास लागला.त्याचे कारण रस्त्याने चालताना अनेक लोक त्यांना भेटुन त्यांच्या समोर आपले  प्रश्न मांडीत होते. त्यांच्या समस्येवर काय करावे या बाबत सल्ला विचारीत होते आणि सुनिल येवले न थकता प्रत्येकाला माहीती देवुन आधार देत होते. काही ठीकाणी ते स्वता उपस्थिती राहुन आधिका-यांना भेट घेतील व प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करतील असे समस्याग्रस्त व्यक्तीला वचन देत होते.कोणतेही प्रशासकीय कींवा राजकीय मोठे पद नसताना लोक त्यांना एवढे का मानतात हा प्रश्न माझ्या मनात आला आणि मी त्याचा शोध घेवू लागलो.अनेक लोकांशी चर्चा केल्यावर लक्षांत आले येवलेंचा प्रामाणिकपणा लोंकां प्रती आसलेले प्रेम हेच त्याच भांडवल होते. आणि बहुदा त्याचमुळे त्याच्याकडे कोणतेही साधन सत्ता नसतानाही लोक त्याच्या भोवती जमतात.हीच त्यांची कमाई आहे.

     ते सामाजिक राजकीय कार्यात कसे आले याचाही मोठा इतिहास आहे.ते आपघाताने कींवा अचानक सामाजिक कार्यनेकर्ते झाले नाहीत.सामाजिक कार्यकर्ता होण्यापुर्वी ते नेव्ही मधे आधिकारी होते.अंशीच्या काळात दलित अत्याचाराचे प्रमाण वाढले होते.शिकलेला आंबेडकरी विचाराचा तरुण अस्वस्थ झाला होता.अन्याय अत्याचारा विरोधातील चीड त्यांच्या मनात निर्माण झाली होती.तशातच नामांतर चळवळीने  वेग घेतला होता.येवलेंचा पिंड हा नेतृत्व करणारांचा होता.पँन्थरचे बरेच कार्यकर्ते त्याना कार्यलयात भेटायला यायचे.नेव्ही मधे कार्य करीत असताना पँन्थरची चळवळ भरास आली होती.त्यांची नेव्हीची नोकरी त्यांनाच अडसर वाटायला लागली होती.नेव्हीची शिस्त कडक असते.अशा वेळी चळवळीत वेळ द्यायचा की सर्वसामान्य माणुस म्हणुन नोकरी सांभाळत आपला घरसंसार असा गाडा हाकायचा असे द्वंद्व त्यांच्या मनात निर्माण झाले होते.पुर्ण विचारांती त्यांनी नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला.त्यांच्यातील कार्यकर्ता जिंकला. त्यांनी नोकरी सोडली आणि पुर्ण वेळ ते आंबेडकरी चळवळीत कार्य करायला लागले. त्यांना आता मनाप्रमाणे कार्य करता येणार होते. पण या निर्णयाप्रत पोहचणे त्याच्या साठी तेवढे सोपे राहीले नव्हते.कारण उपजिवकेचे दुसरे साधन त्यांच्या समोर नव्हते.असे असताना कायम स्वरुपाची नोकरी सोडणे हे तसे खुप धाडसाचे म्हणावे लागेल. पुढे काहीतरी करणे क्रमप्राप्त होते.परीणामी पुढे येणाऱ्या अनेक आव्हानांना तोंड देत ते जगत आणि लढत राहीले. समाज कार्याची आवड म्हणुन मग एखाद्या सामाजिक संस्थेत काम का करीत नाहीस असे एका मित्राने सुचविल्या नंतर त्यांनी एनजीओत काम करण्याचा निर्णय घेतला. सुनिल येवले हे स्वाभिमानी होते.त्यांना खोटे बोलणे तडजोड करणे कधी जमले नाही.

   ती सामाजिक संस्था रस्त्यावरील मुलांसोबत काम करायची.काही महीने त्यांनी मनापासुन वंचित मुलासोबत काम केले.रस्यावरील मुलांना मुख्य प्रवाहात आणण्याच्या दृष्टीने ते कार्यकरीत राहीले आपण एका चांगल्या संस्थेत काम करतोय अशी त्यांची मनोभावना निर्माण झाली होती.रस्यावरील मुलांसोबत काम करण्याचा अनुभव त्याना अजूनही आठवतो.रस्यावरील मुले घरदार सोडून पळून आलेले आसतात.रस्यावर भटकतांना क्रुर जगांची त्यांची ओळख झालेली असते परीणामी ते नैराश्यग्रस्त होऊन व्यसनधीन झालेले असतात अशा मुलांसोबत काम करणे सोपे नसते पण येवलेनी त्या मुलांशी चांगले नाते निर्मामाण केले होते.त्यातील बरेच मुले हे महीनो महीने आंघोळ करीत नाहीत कपडे बदलीत नाहीत अशांना अंघोळ घालुन चांगले कपडे घालुन एक माणुस म्हणुन जगण्याची संधी निर्माण करण्याचे काम करण्याची संधी लाभली याच त्यांना समाधान वाटते.ते सांगतात त्यावेळी या सर्व मुलांना स्वच्छ करुन चांगले कपडे परीधान करुन त्यांच्या हातात तिरंगा देवून आम्ही एक रँली काढली होती ती मला अजुनही आठवते.त्या कामाच त्यांना खुप समाधान वाटले होते.मात्र त्याचे हे समाधान जास्त दिवस टीकले नाही.

   एक दिवस संस्थेमधे मुलांचा कार्यक्रम होता.काही बाहेरुन सन्माननिय पाहुणे आले होते.मुलांना वडापाव वाटल्या गेला.पाहुण्याना मात्र चांगल्या वातानूकुलित हाँटेलातील अन्न देण्यात आले.ही विषमता येवलेना खटकली आणि जे खटकते ते मनात ठेवायचे त्यांचा स्वभावातच नसल्यामुळे ते याबद्दल वरीष्ठाना बोलले.वरीष्ठाने त्याचे हे बोलणे शिष्टाचाराला धरुन वाटले नाही परीणामी त्यांना आपला राजीनामा त्याच्या स्वाधिन करावा लागला.आपला स्वाभिमान ते जपत राहीले पण परीणामी जगण्यासाठी कराव्या लागणाऱ्या कसरती त्यांना मोठ्या प्रमाणात कराव्या लागत होत्या.ते सर्व सांभाळुन समाजकार्य त्यांनी प्रामाणिकपणे चालू ठेवले होते.

   शिवाजी नगर गोवंडीत एकमेव मोकळे मैदान होते.त्यात् मैदानाला सारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर खुले मैदान म्हणुन सारे ओळखतात.या मैदानात आसपासच्या झोपडपट्टीतील मुले सराव करायचे, क्रीकेट खेळायचे.अशा या मैदानाच्या जागेवर पोलिस स्टेशन उभारायची योजना आली होती. ती योजना आल्याचे जेव्हा येवलेंना कळले तेव्हा त्यांना स्वस्थ बसवेना.हे सारं अन्यायकारक असल्यांचे त्यांना वाटत होते.या पट्ट्यात अनेक संस्था कार्यरत होत्या पण त्या या प्रश्नावर ठोस भुमिका घेवून बाहेर पडाल्या नव्हत्या.यावर येवलेनी समविचारी लोकांशी चर्चा करायला सुरवात केली.जगन्नाथ त्यावेळी अपनालय मधे काम करायचा त्याला हा लढा महत्वाचा वाटला होता.फोर्स संस्थेचे प्रकाश सोनावणे हे येवलेसोबत या लढ्यात सक्रीय झाले होते. हळुहळु सारे लोक संघटीत होत गेले.विविध संस्थाशी संपर्क होत गेला.लोकांच्या बैठका होऊ लागल्या. आणि हळुहळु मैदान बचाव नावाची भव्य लोक चळवळ उभी राहीली.या चळवळीचा रेटा एवढा वाढला की शेवटी मैदान हे लोकांसाठीच राहील ही हमी लोकांना प्रशासनाकडुन मिळाली.या मैदान बचाव चळवळीचे श्रेय ते अनेकांना देत असले तरी त्यात सिंहाचा वाटा येवलेंचा होता हे कुणीही नाकारु शकत नाही.

    रिपब्लिकन गटा तटाच्या राजकरणाने ते व्यथित झाले होते त्यात ते काम करीत असलेल्या गटातील नेते मंडळीचे आणि त्यांचे वैचारिक तसेच भुमिका घेण्याबाबत मतभेद होत गेले.शेवटी या सा-या गोष्टीना कंटाळुन ते काँग्रेसमधे गेले पण काँग्रेसचा मुळचा स्वभाव मितभाषी संयमित राहुन लोकांच्या प्रश्नावर काम करीत आहोत हे चित्र निर्माण करण्याचे कौश्यल्य त्यांना प्राप्त करता आले नाही कींवा ते त्याच्या स्वभावातच नव्हते.तिथेही त्याचे आक्रमक वागणे लोकप्रश्नावर सरकारच्या विरोधात बोलणे कधी स्वयकीयांवर शाब्दीक हल्ले चढवणे हे त्यांनी चालुच ठेवले.बरेच सहकारी त्यांना खाजगीत म्हणातात तुम्ही बरोबर बोलता पण असे उघडपणे आम्हाला बोलता येत नाही.आणि ती आमची संस्कृतीही नाही.

  असंघटीत क्षेत्र हे वाढत चाललेले आहे.असंघटीत क्षेत्रात येणारे बांधकाम मजूर घरेलु कामगार यांच्या व्यथांना अंत नाही.नाक्यावर उभे राहुन दररोज काम मिळेलच की नाही यांची शास्वती नाही. व्यसनधीनता बेरोजगारी याने पिडीत कामगार बकालीचे आयुष्य जगत आसतो.त्याच्या प्रश्नावर काम करताना अनेकदा पोटतिडकेने येवले बोलत असतात.आता अस्तित्वात आलेली बांधकाम कामगार कल्याणकारी बोर्डाची खरी कल्पना ही सुनिल येवले यांचीच याचा मीही साक्षीदार आहे.मातौर आता ती कल्पना सरकारी विध्वानांनी निर्माण केली हेच आपणास ऐकायला मिळेल.काहीही असो पण बोर्ड अस्तित्वात आले आणि आता हळुहळु लोक त्याचा लाभ घेतात यातच मला समाधान वाटते असे ते मत मांडतात.एवढे सारे करुनही कामगार क्षेत्रात केलेले त्याचे योगदान कोणीही विचारात घेतले नाही याचे मला दुःख वाटते.  ब-याच लोकांना त्यांची ही ओळख माहीत नाही.नाकाकामगाराना न्याय मिळवून देण्यासाठी सी एफ टु आय या आंतरराष्ट्रीय युनियन सोबत कार्यरत राहुन ते असुन विविध मोर्चा आंदोलनत पुढाकाराने असतात.गोवंडीच्या नाकाकामगार तसेच घरेलु कामगारात ते विषेश लोकप्रिय आहेत असे मला ब-याचदा जाणवत आले आहे.

    अराजकीय पक्षाचा नगरपालिका प्रभागात नामनिर्दीशित नगरसेवक म्हणुन त्यांची कारकीर्द विषेश लक्षणिय ठरली होती.ब-याच वर्षाने या पदास योग्य पदाधिकारी लाभला हे त्यावेळचे निर्वाचित नगरसेवकही म्हणत कारण कोणत्याही विषया बाबत येवलेचा अभ्यास असायचा ते आपले मते अभ्यासुन मांडीत परीणामी प्रशासनाला अडचणीत आणुन ते लोकांचे प्रश्न सोडवुन घेत.चेम्बुर परीसरात ब-याच कंपन्या आहेत त्यांना पाणी मुबलक लागते अशा वेळी पाणी तिकडे वळवल्यामुळे साहजिकच तो भार रहीवाश्याच्या वापरातील पाण्यावर येवून पाणी कपाती सारखे संकटाना रहीवाश्यांना तोड द्यावे लागते.यावर येवलेंनी सांगितलेला तोडगा महत्त्वाचा होता.चेम्बुर मधे गावठान असलेला भाग मोठा आहे.तिथे जून्या काळातील विहीरी अजूनही अस्तित्वात आहेत पण त्या विहीरीचे पाणी पिण्या योग्य नसल्याने कोणी वापरत कींवा पीत नाहीत. अशा या विहीरीचे पाण्यावर रासायनिक प्रकीया करुन ते पाणी जर कंपनीला पुरवले तर त्यांना दिले जाणारे पाणी हे रहीवाश्याना मिळू शकल्यास पाणी प्रश्न काही अंशी सुटु शकतो.हा येवलेनी मांडलेला प्रताव ब-याच आधिका-याना आवडला होता.मात्र पुढे त्यावर म्हणावे तेवढी कार्यवाही झाली नाही.दुर्दैवाने आपल्याकडे ब-याच चांगल्या गोष्टी घडवून आणण्यासाठी लागणारी इच्छा शक्ती दिसत नाही.नाहीतर बरेच प्रश्न आपले सुटु शकतील.खरे पाहीले येवलेसारखे व्यक्तीमत्व हे निर्वाचित नगरसेवक कींवा आमदार असायला हवे होते पण अर्थिक अडचणी आडव्या येतात.आणि आपण सारे जानतो निवडणुका म्हणजे नुसता पैशाचा खेळ झालाय.अशा आशयाचा वाक्यप्रचार सातत्याने आपण ऐकत आलो आहोत.सभोवतालची परिस्थिती पाहीली की यांची सत्तता पटते.सुविधा सहकारी संस्थाच्या माध्यमातुन पैसे द्या आणि वापरा या तत्वानुसार शौचालयाचे कार्य चालायचे.हे संघटीत प्रयत्नाने चाललेल्या कार्यात येवल्याचा वाटा होता.सुविधाच्या माध्यमातुन काँपरेटीव्ह सोसायटी तय्यार करणे.त्यातील काही रक्कम खर्च करुन दुर्गम भागात समाजकार्य करणे असे अनेक उद्दिष्टे उराशी बाळगुन त्याकाळात येवले व काहीजन कार्यरत होते.मात्र व्यवस्थित समायोजन न झाल्यामुळे त्या कार्याला खंड पडला.

  मध्यतरी काही संस्था संघटनानी त्याच्या कार्याची दख्खल घेवून त्यांना पुरस्कार देवून त्यांचा सन्मान केला.कामगार नेते दत्ता कट्टी यांचे नावे त्याना  दामोधर नाट्यरागृहात एका भरगच्च कार्यक्रमात राजाराम खरात यांच्या हस्ते त्यांचा सन्मान केला गेला.त्याच बरोबर छात्रभारतीने त्यांना गोवंडी भुषण पुरस्कार देवून त्यांचा सन्मान केला. काँग्रेसमधे कार्य करीत असताना गुरुदास कामत यांच्या हस्ते उत्कृष्ट शोशल वर्कर हा पुरस्कार देवून त्यांना सन्मानित केले.आपण केलेल्या कार्याची दख्खल घेवून आपणास सन्मानित करण्याचे असे अनेक  प्रसंग त्यांना समाधान देतात.पण खरे समाधान त्याना तेव्हाच वाटते जेव्हा लोंकाच्या डोळ्यात ते आपल्या बद्दलची आपूलकी पाहतात.आणि हे प्रेम, आपुलकी त्यांच्या कामातुन निर्माण झाली आहे.

खरं पाहील तर येवले यांच्यात एक प्रतिभांवत पेटलेला कवि दडलेला आहे.ही त्याची ओळख पुढे आलीच नाही.त्यांनीच त्याच्यात दडलेल्या कविवर अन्यायच केला आहे असे मला वाटते.त्याची कवि म्हणुन असलेली प्रतिभा खुप कमी लोकांना परीचित आहे.पण कधी कधी बोलण्याच्या ओघात तौयाच्यातुन सुप्त कवि जागृत होतो.आणि मग लाव्हा रसासारख्या तप्त कविता बाहेर पडायला लागतात.एवढी वर्ष झाली पण अजूनही त्यांच्या काही कविता मुखपाठ आहेत.या जिंदगिच नाव हेच ठेवावे नाहीतर काय? ही त्याची मुक्तछंदातील कविता मनाचा वेध घेते.आयुष्यात भोगलेले क्षण.इथली दांभिकता संस्कृतीतील अनिष्ट रुढी यावर त्यांच्या कविता आसुढ ओढतात.पण या कविता ते प्रसिध्द करीत नाहीत कींवा त्याचे वाचन करीत नाही…पण एक मात्र निश्चितच आहे हा हाडामासांचा जिवंत माणुन परीस्थिती पुढे न हरता सतत पुढे जावुन दोन हात करण्याची तय्यारी ठेवतो.या अशा परीपक्व नेतृत्वाची समाजाला नक्कीच गरज असते,संघर्षमय जीवन जगलेले सुनील येवले साहेब आता आपल्यात नाहीत ही खूपच दुखदायक भावना आहे. पण बुद्धाने सांगितलेले जीवनाचे सत्य आपणास स्वीकारावे लागते.कामगार नेते संवेदनशील कार्यकर्ते सुनील येवले साहेब यांना भावपुर्ण आदरांजली.

राजू रोटे ८४५४०७८०७३,चेंबुर मुंबई.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *