युवा पत्रकार सिद्धार्थ अशोक तायडे यांना राज्यस्तरीय “महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार” जाहीर !

बातमी शेअर करा.

विशेष प्रतिनिधी नांदुरा : तालुक्यातील वडनेर भोलजी येथील पत्रकार सिद्धार्थ अशोक तायडे यांना साऊ ज्योती सामाजिक फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या विद्यमाने राज्यस्तरीय “महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार 2025” जाहीर करण्यात आला आहे.हा पुरस्कार वितरण सोहळा रविवार दिनांक 23 मार्च 2025 रोजी वेळ सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आला आहे.पुणे येथील भारत इतिहास संशोधन मंडळ 1321सदाशिव पेठ पुणे येथे हा भव्य दिव्य पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होणार आहे.अशी माहिती या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक साऊ ज्योती सामाजिक फाउंडेशनचे अध्यक्ष सचिन भाऊ हळदे यांनी पत्रकार सिद्धार्थ तायडे यांना पुरस्कार निवड पत्र पाठवून कळवले आहे. आपण अनेक वर्षापासून निस्वार्थपणे निर्भिंड पत्रकारितेच्या माध्यमातून सामान्य जनतेला त्याचे न्याय व हक्क मिळवून देण्याचे अनमोल कार्य करीत आहात.तथा आपल्या लेखणी द्वारे आपण लोकशाही अबादीत ठेवत आहात.या प्रशासकीय व उल्लेखनीय कार्याची कृतज्ञता व्यक्त करीत आपणास आम्ही साऊ ज्योती फाउंडेशन च्या वतीने वर्ष 2025 या वर्षाचा राज्यस्तरीय “महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार” प्रधान करत आहोत.तसेच भावी वाटचालीसाठी आपणास शुभेच्छा.आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी आपण आपल्या परिवार व मित्र परिवारासह उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी हीच विनंती असे पत्रात म्हटले आहे.सिद्धार्थ तायडे यांना पत्रकारिता क्षेत्रातील अमूल्य योगदानाकरिता यापूर्वी सुद्धा पाच राज्यस्तरीय पुरस्कार मिळालेले आहेत.या पूर्वी सुद्धा बीड,सांगली,कोल्हापूर,मलकापूर आणि मेहकर येथील सामाजिक संस्था आणि फाउंडेशन च्या वतीने गौरव पत्र आणि सन्मान चिन्ह (शील्ड) पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.साऊ ज्योती फाउंडेशनचा राज्यस्तरीय “महाराष्ट्र गौरव पुरस्कार” सिद्धार्थ तायडे यांना जाहीर झाल्याबद्दल त्यांच सर्वत्र कौतुक होत असून त्यांच्यावर मित्र परिवारा कडून अभिनंदनचा वर्षाव होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *