झालं बरबाद हे जीवन नारीच,केलं वाटोळ हुंड्यान पोरीच.

बातमी शेअर करा.

 “हुंडा आणि मुलींचा बळी” हे समीकरण इथल्या समाज व्यवस्थेच्या अंगवळणी पडलेला आहे त्यांना मुलींचे बळी जाणं मरणं हे जास्त चिंता जनक वाटत नाही? काहीच दिवसापर्यंत तिच्या दुःखा बद्दल हळहळ व्यक्त केली जाते पण तिच्या आई-वडिलांना झालेल्या वेदना तिच्या त्या गोंडस- निरागस मुलांला पोरके पण देणारी वेदना दिसेल काय?.
खरंतर हुंडा,,,,, हुंडा ही एक अनिष्ट रूढ समाज मनावर घाला घालणारी निच प्रथा आहे अशा समाज विघातक प्रथेला वाव देत खरंतर मोठ मोठ्या सुशिक्षित,श्रीमंत घराणी प्रतिष्ठेसाठी  या प्रथेला वाव देताना दिसतात.
    आज जेव्हा सावित्रीची लेक शिकते मोठी होते आणि या हुंड्याच्या विरोधात उभा राहून बोलते तेव्हा तिचा देखील विरोध केला जातो परंतु ही हुंडा प्रथा स्त्रीचा जिव घेत असेल तर आपण ती मोडण्याचा प्रयत्न केला पाहिजे कायद्याने जरी मोडीत काढली असली तरी हरामी मानसिकतेचे नराधम तीला दुजोरा देताना दिसतात आणि त्यामध्ये वैष्णवी सारख्या हजारो वैष्णवींचा जीव हकनाक  गमावावा लागतो तर अशा हरामखोर पुरषी मानसिकतेच्या जाचक रूढी विरूद्ध  ठोस कारवाई हुंडा घेणाऱ्या आणि देणाऱ्या वरती  झाली पाहिजे.खरंतर मला इथे सांगावसं वाटतं की मुलींना हुंडा देताना आई-बाबांनी विचार करायला हवा तुम्ही तुमच्या मुलीला हुंडा देता हुंडयामध्ये गाड्या- घोड्या,पैसा अडका,सोन -नानं देता मग या पेक्षा मला तर असं वाटतं की तुम्ही त्या पैशांमध्ये तुमच्या मुलीला एखादा व्यवसाय टाकून द्यावा आणि त्या व्यवसायामध्ये तिचे भविष्य बघावं खरं तर तुम्ही तुमच्या कष्टाची दौलत मुलीसाठी खर्च करता म्हणजे हुंडा देऊन तुम्ही सांगता की माझी मुलगी खूप चांगल्या घरात गेली माझ्या मुलीचं खूप चांगलं झालं आहे ती सुखी आहे.
पण गावकडे ऐक म्हण आहे- “लेक मोठ्या घरी दिली अन् भेटायची अडचण झाली..” अशी अवस्था होत असते तुम्ही त्या घरी हक्काने जाऊ शकत नाही जास्त दिवस राहू शकत नाही असला मोठेपण काय कामाचा त्यापेक्षा तुम्ही तो पैसा तिच्या भविष्यासाठी तिच्या शिक्षणासाठी खर्च केला पाहिजे आणि तिला स्वतःच्या पायावर उभे करा जेणे करून ती अशा गोष्टींना तोंड देण्यापेक्षा किंवा गुदमरून आत्महत्या करण्यापेक्षा ती स्वतःच्या पायावर वेगळ्या पद्धतीने उभी राहील आणि स्वतःचं जीवन सुखाने आनंदाने जगेल.तुम्हाला बघायला तरी मिळेल पण आज अशा वैष्णवी सारख्या हजारो घटना पाठी मागे झालेल्या आहेत आणि पुढे ही होत राहतील आपण सांगू शकत नाही खर तर सत्तेचा माज असल्यामुळे आणि राजकीय दबावामुळे या घटना घडल्या जातात तर कुठेतरी याला आळा बसला पाहिजे कुठेतरी या थांबल्या पाहिजेत आणि त्यासाठी खरं तर मी एक स्त्री म्हणून सांगते मुलींनो तुम्ही भक्कम व्हा! तुम्ही आत्मनिर्भर बना “तुम्ही अबला नसून सबला आहात” हे नेहमी स्वतःला सांगत चला तुम्ही सबला झाल्या शिवाय हा समाज तुम्हाला घाबरणार नाही जोपर्यंत तुम्ही पुरुषप्रधान या दडपशाही मध्ये राहणार आहात तोपर्यंत तुम्हाला या देशात राष्ट्रात पुरुषप्रधान या नावाखाली नेहमी गाडल जाईल जोपर्यंत तुम्ही त्याचा कडाडून असा विरोध करत नाही या पुरुष प्रधान संस्कृतीचा तोपर्यंत तुम्हाला दाबलं जाईल पिळलं जाईल त्यासाठी तुम्ही शिका आणि या अशा भयंकर प्रथेला लाथ मारा अस मी प्रत्येक स्त्री वर्गाला सांगेल प्रत्येक मुलीला सांगेल आणि तुम्ही सक्षम व्हा पण तुम्ही वैष्णवी सारखी  हुंडाबळी बनू नका आणि स्वतःचा हा अनमोल जीव गमावू नका,उध्वस्त करु नका..
     जेव्हा तुम्हाला वाटत आहे की माझ्यावर खूप अन्याय होत आहे सहन होत नाहीये.आई-वडिलांचे इज्जतीसाठी स्वतःचा संसार मोडेल यासाठी तुम्ही जर तो अन्याय सहन करत असाल आणि तो अन्याय करणाऱ्याला जर त्याची जाणीव नसेल तर तो अन्याय कधीच समोर येणार नाही.डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की अन्याय करणाऱ्या पेक्षा अन्याय सहन करणारा मोठा गुन्हेगार असतो.आणि तसा गुन्हेगार तुम्ही बनू नका तर त्याचा सडेतोड विरोध करा त्याच्या पलीकडे जाऊन जर तुमचा त्या संसारिक सुखामध्ये तुम्हाला जर सुख मिळत नसेल तर तुम्ही त्याच्यापासून अलिप्त व्हा आणि स्वतःच एक वेगळं जीवन सुरू करा परंतु तुम्ही जगल्या पाहिजेत तुम्ही वाचल्या पाहिजेत कारण की अशा पुरुषांना त्यांच्या पैशाच्या माजावर अनेक बायका मिळतील.परंतु तुमच्या मुलाला आई मिळणार नाही आणि तुमच्या आई-वडिलांना मुलगी मिळणार नाही या विचाराने तुम्ही जगा तुम्ही असा आत्महत्येचा निर्णय कधीच घेऊ नका त्याच्याने फक्त तुमचा जीव गमावू शकतो तुमचा जीव जाऊ शकतो आणि याचा दुःख आजीवन तुमच्या आई-वडिलांना राहणार आहे त्यामुळे सर्व मैत्रिणींना सर्व महिला भगिनींना हात जोडून विनंती आहे की अशा गोष्टींना भिडा लढा परंतु स्वतःचा जीव कधीच गमावू नका.
“”हुंडा घेऊ नका हुंडा देऊ नका”””
ऐका कवीच्या ओळी आहेत की
“झालं बरबाद हे जीवन नारीच
केलं वाटोळ हुंड्यान पोरीच””


लेखिका/कवयित्री :
आम्रपाली सुशीला ज्ञानोबा पारवे बीड  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *