
विशेष प्रतिनिधी मुंबई – विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या घराण्याशी आणि त्यांच्या समतावादी विचारधारेशी एकनिष्ठ राहून कार्य करणारे,आणि आंबेडकरी विचारांचा निष्ठावंत कलावंत,भिम सैनिक जयेश संजय सूर्यवंशी म्हणजेच अभिनयात उदयास येणारा नवा चेहरा आहे.आपल्या सर्वांचे लाडके कलाकार जयेश संजय सूर्यवंशी आज मराठी मनोरंजन क्षेत्रात एक वेगळी छाप सोडत आहेत.
वेगवेगळ्या मराठी सिरिअल्स आणि चित्रपटांमध्ये आपल्या अप्रतिम अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकताना ते दिसत असून,तरुण कलाकारांसाठी ते एक “प्रेरणादायी” नाव ठरत आहेत.अभिनय क्षेत्रात नवोदित कलाकारांची होणारी फसवणूक थांबवण्यासाठी जयेश स्वतः पुढाकार घेत असून,अनेक तरुणांना योग्य मार्गदर्शन व संधी उपलब्ध करून देत आहेत. त्यांच्या या सामाजिक व कलात्मक योगदानाला सर्व समाजातून विशेष भांडुप च्या नागरिका कडून विशेष कौतुक करून “निळा सलाम’ करण्यात येत आहे. कोणत्याही कलावंताच्या कला अभिनयाला जाती,धर्माचे प्रांता च्या सीमा नसतात. ते आपल्या अभिनयाने चाहत्याच्या मनावर प्रभाव टाकत असतात. त्यामुळे काही कलावंतांनी आपली जात आणि विचारधारा लपून ठेवली तर त्याला योग्य वेळी त्याला नाहक त्रास दिला जातो. हा अनुभव पाठीशी असल्यामुळेच मी आंबेडकरी विचारांचा निष्ठावंत कलावंत,जयेश संजय सूर्यवंशी अभिनयात उदयास येणारा नवा चेहरा आहे असे गर्वा ने सांगतो.म्हणूनच तो कौतुकास मान सन्मानास पात्र आहे.
जयेश सूर्यवंशी यांनी केलेल्या सिरियल्स प्रेमास रंग यावे,कोण होतीस तू काय झालीस तू,आदिशक्ती,सावळ्याची जणू सावली,लक्ष्मी निवास,लक्ष्मीच्या पावलांनी,साधी माणसं, तू ही रे माझा मितवा,तुला जपणार आहे,नशीबवान,शुभ विवाह,जय जय स्वामी समर्थ इ.बऱ्याच सिरिअल आणि चित्रपटा मध्ये अभिनयाची छाप पडली आहे.आगामी काळातही जयेश संजय सूर्यवंशी यांनी आपल्या अभिनयाच्या बळावर दिग्गज कलाकारांसोबत काम करण्याची संधी मिळावी ही अपेक्षा, करत त्याने अधिक उत्तुंग यश संपादित करावे, हीच विश्वशांती बुद्धविहार,महामाया बौद्ध महिला मंडळ,जमिल नगर,भांडुप (पश्चिम) यांनी आणि त्यांच्या चाहत्यांची आणि समाजाची मनापासून इच्छा आहे.त्यांच्या पुढील कलात्मक वाटचालीसाठी पत्रकार साहित्यिक कामगार नेते सागर तायडे यांनी मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा दिल्या.
सागर तायडे भांडुप यांस कडून
