
आजकाल फुले-आंबेडकरी चळवळीमध्ये बंडखोरी करण्याचे फॅड निर्माण झाले आहे.चला! पक्षाने आपण ठरवलेला उमेदवार नापसंत करून दुसऱ्याला उमेदवारी दिली ना! तेव्हा आता आपण एक काम करू! या आपल्या मनपसंत गड्याला निवडून आणू,आणि मग परत पक्षाकडे घेऊन जाऊ! मग असं जर असेल! तर पक्षाच्या बाजूने लढायचं कोणी?.ठीक आहे! एखादी दुसरी व्यक्ती इकडे तिकडे झाली काय आणि नाही झाली काय! परंतु जर प्रत्येक सर्कल मधून असेच निर्णय व्हायला लागले तर मग पक्षीय राजकारण कशाला करायचं? खुशाल आपापल्या परीने निवडून या! आणि नंतर चळवळीत सामील व्हा!
पक्षाला काही महत्त्व राहिले नाही, तरी चालेल! नाही का?
याला मग! नौ सो चूहे खाकर! बिल्ली हज को चली! असेच म्हणावे लागेल ना? परंतु आज काल बऱ्याच कार्यकर्त्यांना नौ सो चूहे खाऊन परत पक्षात येऊन स्वतःला मिरवणे म्हणजे मी स्वतः किती पावरफुल आहो! हेच दाखविण्याचा त्याचा सतत प्रयत्न असते! या ठिकाणी मी हे जे काही वास्तव मांडत आहो! ते काही कोण्या एका पर्टिक्युलर व्यक्तीसाठी नसून अशा घटना अनेक घडत आहेत म्हणून हा मुद्दा सार्वजनिक रित्या घेतला पाहिजे! नाहीतर मग मी, कुणाला तरी टार्गेट करून कोण्या एका व्यक्तीला उपरोधिकपणे बोलत आहो! असा कोणीही गैरसमज करून घेऊ नये! मात्र ज्या चळवळीत आपण काम करतो त्या चळवळीच्या विरोधात जाऊन चळवळीवर आपला निर्णय थोपवणे काहीही झाले तरी ते चुकीचे आहे! असे माझे मत आहे…
कारण काय?.कारण की,तुमचा जो बंडखोरीचा निर्णय असते तो सार्वजनिक स्वरूपाचा नसते. की,ज्याला आपण सामाजिक उत्थानाचा निर्णय म्हणू शकतो! तशा स्वरूपाचा तो नसते तर तो व्यक्तिगत अहंकारापोटी घेतलेला फार मोठा चुकीचा निर्णय असते! तुमचा बंडाचा निर्णय हा फक्त तुमच्या स्वतःपुरता असते आणि चळवळीचा निर्णय हा समाजाच्या फार मोठ्या हिताचा असते हे जर लक्षात घेतल्या गेले तर कार्यकर्ता कितीही पावरफुल असो तो असा स्वतःपुरता परंतु समाज घातकी निर्णय कधीच घेऊ शकत नाही.फौजमधे ज्याप्रमाणे कमांडींग ज्याच्या हाती त्याचाच आदेश शिरसावंध्य मानल्या जाते मग तो चुकीचा का असेना!
जसे सेनापतीने एकदा फायर म्हटलं की गोळीबार हा करावाच लागतो! त्याला चॅलेंज नसते! तशीच पक्षात सुद्धा शिस्त हवी असते.एकदा पक्षाचा निर्णय झाला की त्याला काहीच चॅलेज नसायला पाहिजे! आपली तलवार सेनापतींनी म्यान करायची सांगितली ना! ती झालीच पाहिजे!.बस्स! इथेच काही कार्यकर्त्यांचा इगो जागृत होते! आणि मग याच इगोमुळे बंड या गोंडस नावाखाली गद्दारी करण्यात येते! आणि वरून विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे आम्हीच खरे पाईक आहोत असे लोकांना भासवण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांच्या जय जयकाराने सारा आकाश पाताळ दुमदुमून टाकतात. काय या नुसत्या आरोळ्या नसतात? अरे जे बाळासाहेब आंबेडकर बाबासाहेबांचा आदर्श आपल्या डोळ्यात समोर ठेवून आदिवासी बांधवांन पासून ते गरीब मराठ्या पर्यंतच्या एकूणच सर्व वंचितांना न्याय मिळावा म्हणून त्यांचा सत्तेत सहभाग असावा म्हणून दिवस रात्र 40-42 वर्षापासून संघर्ष करीत आहेत आठवले साहेब आणि कवाडे सरांसारख्यांना जनरेटा नसताना जर आमदारक्या खासदारक्या मिळतात तर मग बाळासाहेब आंबेडकरांना एक-दोन मंत्रिपद मिळूऊन घेणे आणि सात पिढ्यांना पुरेल एवढे कोठ्याधिश होणे काही कठीण गोष्ट आहे का? परंतु त्यांना ते मंत्रिपद का नको का असते? माझ्या मते त्याचे कारण असे आहे की, ऍड बाळासाहेब आंबेडकर हे जॉज्वल स्वाभिमानी बाबासाहेब आंबेडकरांचे नुसत्या रक्ताच्या नात्यानेच नातु नाहीत. तर बाळासाहेब आंबेडकर हे बाबासाहेबांच्या एकूणच साऱ्या विचाराचा वारसा जोपासणारे प्रखर स्वाभिमानी नेते आहेत हे आपण कधीच लक्षात घेत नाही म्हणूनच ऍड.बाळासाहेब आंबेडकर म्हणतात “इथे मी हारत नाही,तुम्ही मला हरवता” हे भयानक वास्तव लक्षात घेऊन आम्ही कधी वागु? या धगधगत्या विस्तवासारख्या वास्तवावर आम्ही विचार न करता नुसता मला का तिकीट नाही? झालं! इगो दुखवल्या गेला,म्हणून बंडखोरी करतो! दुसरी गोष्ट मला मत मागायला कोणी पक्षाचा उमेदवार माझ्या दारात येत नाही! म्हणून काहींची बंडखोरी असते! वा रे वा! फुले- आंबेडकरी विचारधारा तुमची!
अरे मित्र हो, तो पक्षाचा उमेदवार जरी तुमच्या दारात आला नाही तरी तो तुमच्या बळावर उभ्या राहिलेल्या आंबेडकरी चळवळीतुन जर निवडून आला आणि कधी बेइमानीवर उतरला,तर त्याची पक्ष उचलबांगडी करते की,नाही? याचा अर्थ त्याला बेअब्रू करण्याचा अमूल्य अधिकार हा चळवळीतील कार्यकर्त्यांकडे राखून ठेवलेला असते!
मग ज्या व्यक्तीची कधीकाळी थुंकी अथवा पाऊले रस्त्यावर प्रस्थापितांना दिसू नयेत म्हणून त्यांच्या कमरेला झाडू होता. तेव्हा मग अशा अवस्थेतून ज्या प्रज्ञासुर्य डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी मताधिकार्याच्या माध्यमातून आमचा झाडू काढून टाकला.सन्मानाचे जीवन दिले आणि त्याच प्रज्ञा सूर्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून जर बाळासाहेब आंबेडकर तुमच्या आमच्या हक्काच्या सत्तेसाठी अहोरात्र संघर्ष करीत असतील तर हे सारे त्यांचे कष्ट समजून घेण्याऐवजी आम्ही आमचाच सर्वांगीण विकास करणाऱ्या चळवळीच्या विरोधात बंडखोरी करत असू तर कोण म्हणू शकते की आमची बुद्धी ठिकाण्यावर आहे? शेवट…
तरीही बंडखोरी करणाऱ्यांना गद्दार म्हणायचं की खुद्दार म्हणायचं? याचे उत्तर अभिव्यक्ती स्वातंत्र्यामुळे ज्याला जसे द्यायचे तसे तो देऊ शकते!.परंतु नैतिक दृष्टीने आणि वैचारिक अंगाने फुले-आंबेडकरी विचारधारा अंगीकारून प्रगल्भता लाभलेल्या चळवळीतील कार्यकर्त्याचे काय उत्तर येईल?.त्या येणाऱ्या उत्तराच्या प्रतिक्षेत मी आहे!
जय भीम जय भारत
जीवन बोदडे- 9689268620,भांबेरी अकोला जिल्हा.
