
हो…हे चित्र पुन्हा निदर्शनास येत आहे. गेल्या काही वर्षात या सर्व गोष्टी समाजातून हद्दपार झाल्या होत्या.परंतु 2023 पासून पुन्हा आंबेडकरी वस्त्यांनमध्ये मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव नवरात्रोत्सव दहीहंडी या उत्सवांमध्ये प्रचंड वाढ झालेली दिसत आहे.मी कोणत्याही धर्मावर टीका करण्याच्या उद्देशाने बोलत नाही. परंतु सामाजिक आणि धार्मिक अंगाने तावून सलाखून निघालेला समाज या समाजातील काही तरुण इतके एहसान फरामोष निघतील याचा विचार देखील त्रास देणारा ठरत आहे.कालच्या गणेशोत्सवाच्या आगमनात चेंबूर गोवंडी विभागामध्ये मोठ्या प्रमाणात स्वतःला जय भीम म्हणवून घेणारा समाज अग्रेसर दिसला.अक्षरषा काही महाभाग मला पाहून तोंड लपवत मिरवणूकीतून नाहीसे झाले.कशासाठी एवढा अट्टाहास का एवढी खाज.ज्यांचा तो उत्सव आहे ते सक्षम आहेत.तुमच्या सारख्या बाडग्यांची त्यांना अजीबात गरज नाही. तुम्हाला त्यांची एवढी काळजी आहे तर व्हा पुन्हा हिंदू आमची काहीच हरकत नाही.
बौध्द समाजात ही भेसळीची पैदास मुळीच नको. जीथे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा जर हे खून करत असतील, तर ते समाजाचे काय होणार…? ज्या डॉ.बाबासाहेबांनी 1936 साली मुंबई महार इलाका परिषदे मध्ये हिंदू धर्माचा कोणताच सण साजरी करू नका म्हणून सांगितलं त्या नंतर 21 वर्षांनी धर्मांतर केलं. आणि मग आम्ही बौद्ध झालो.1936 ला डॉ.बाबासाहेब आंबेडकर काय म्हणतात महार जातीने यापुढे हिंदू देव देवतेची पूजा अर्चना करू नये.हिंदू धर्मातील कोणताच सण साजरी करू नये.व्रत वैकल्य उपवास वगैरे पाळू नये. हिंदूंच्या कोणत्याही उत्सवात भाग घेऊ नये. तीर्थयात्रा करू नये.31 मे 1936 महार इलाका परिषदेचा हा ठराव आहे.का बरं डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी जाहीरीत्या इतका मोठा टोकाचा निर्णय घेतला असेल.याचं कारण याच देव देवूस्की मुळे हजरो वर्ष हा समाज मानसिक गुलामीतच राहिला.तो सामाजिक साक्षर झालाच नाही.पर्यायी त्याला हजारो वर्ष गुलाम म्हणून त्याच शोषण झालं.आणि आज आंबेडकरी समाजातला काही तरुण वर्ग केवळ मनोरंजना साठी जुगारासाठी थेट डॉ.बाबासाहेबांच्या विचारांचा खून करण्याचं धाडस आंबेडकरी चळवळीचा खून करण्याचं धाडस समाजात विचाराने मागास असलेले तरुण करत आहेत. आणि पुन्हा हिच माणसं आंबेडकर जयंती करण्यास सुद्धा पुढे असतात हेच समाज्याचं फाटक नशिब आहे.आणि आम्ही मात्र आंबेडकरी चळवळीचे बालेकिल्ले म्हणवून उर बडवत आसतो.

आज तोच किल्ला हिंदू धर्माचा बिल्ला छातीला लावून मिरवत आहे.जो निष्ठांवंत कार्यकर्ता आंबेडकरी चळवळीसाठी जगतो आणि चळवळीसाठी जागतो त्याच्या चळवळीतल्या योगदानाचा हा खून नाही का…? याचा विचार करणारा तरुण समाजात जिवंत आहे का…? हा प्रश्न आता निर्माण झाला आहे. समाजाला पुन्हा हिंदू धर्माच्या दावनीला बांधून धम्मक्रांतीला नासवणारी ही गद्दार पिलावळ बौध्द समाजापेक्षा बौध्द तत्त्वांन पेक्षा आंबेडकरी विचारा पेक्षा वरचढ होऊ कशी शकते..हे बौध्द तत्वज्ञानाच बौध्द समाजाच बौध्द सणांच चित्र हिंदू समाजात दिसेल का…?
हिंदू वस्त्यांमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती, बुध्द जयंती, धम्मचक्र प्रवर्तन दिन,वैशाख पौर्णिमा,अशोका विजया देशमी, महापरिनिर्वाण दिन, हे दिवस हे सण साजरी केले जात आहेत का…? बघा करा सर्वे अरे ते साधा डॉ. बाबासाहेबांचा फोटो लावण्यास तयार नाहीत. आणि त्यांचे देव घेऊन आम्ही मिरवतोय पुजा करतोय.ते जाऊद्या ज्यांनी शिक्षणाची कवाडे सर्वांसाठी खुली केली त्या महात्मा फुले आणि सावित्रीमाई फुले हे हिंदू माळी होते. अर्थात त्यांनाही हे स्वीकारण्यास तयार नाहीत.आणि आम्ही मात्र 70 वर्ष मागे जात आहोत.मी सर्व समाजाला दोष देत नाही.पण तुमच्या घरात एक जण दारू पीत असेल तर तो त्याचा दोष.घरात दोन जण दारू पीत असतील तर कुटुंबाचा दोष.पण घरातला तिसरा पण माणूस दारू पीत असेल तर तो नक्कीच सामाजिक दोष आहे.त्यामुळे 1956 ची धम्मक्रांती आमच्यासाठी नव जीवन आहे. याच दिवशी चातूरवर्ण अंतर्भूत असणारा हिंदू धर्म आम्ही त्यागला. आणि मनुस्मृतीला सर्वस्व मानणारा हिंदू धर्म डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी सोडला.व सामाजिक बंधुत्व जपणारा समता प्रस्थापित करणारा वैज्ञानिक दृष्टिकोन अंतर्भूत असणारा बौध्द धम्म आम्ही स्वीकारला.आणि आम्ही महाराचे बौध्द झालो.याच महारांनी डॉ बाबासाहेब आंबेडकरांची धम्मक्रांती यशस्वी केली.त्या महारांचे कर्ज आताचे बौध्द फेडू शकत नाहीत. आत्ताचे बौध्द पून्हा महार होण्यास हिंदू धर्माची कवाडे खांद्यावर घेत आहेत.जर का हे प्रमाण असंच वाढत राहिलं तर बाबासाहेबांच्या चळवळीचे मारेकरी वर्तमान बौध्द ठरतील हे मात्र निश्चितच.कदाचित हा लेख वाचून काहींना पटणार नाही.पण बौध्द धम्माचा होणारा सामाजिक अपमान सहन होत नाही. याच्यावर वेळीच आळा घातला नाही तर हा आजार रोगात रुपांतर होइल.आणि पुन्हा समाजात मानसिक गुलामी वाढीस लागेल.
आंबेडकरी तत्वज्ञानाचा खून होत असताना बघ्याची भूमिका घेणं म्हणजेच खुनाचं समर्थन करणं होय.यावर मात्तृ संघटनांनी सामाजिक संघटनांनी विचार करावा.अन्यथा बौध्द तत्व केवळ वीधी पुरतं स्वार्था पुरतं मर्यादित राहिलं.बोधिसत्वाची धम्मक्रांती आज धोक्यात आहे.तीला वाचवण्यासाठी आंबेडकरी तरुणांनो वज्र मुठ तयार करा.अन्यथा जय भीम म्हणण्याचा कुठलाही नैतिकअधिकार समाजात शिल्लक राहणार नाही.बाकी तुम्ही समजदार आहात.
नमो बुध्दाय….जय भीम
वैभव सोनवणे-८५९१५९४०३३,अध्यक्ष संगिती फाउंडेशन मानखुर्द,मुंबई (आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ता)



