शून्यातून विश्व निर्माण करणारी मुलगी,पत्नी आणि आई.

बातमी शेअर करा.

एका मुलाचा आईच्या २७ सप्टेबर ६३ व्या वाढदिवसा निमित्य विशेषलेख 

राष्ट्रमाता जिजाऊ,राष्ट्रमाता सावित्रीबाई,राष्ट्रमाता अहिल्याबाई, माता रमाई,माता भिमाई, यांचा आदर्श सुशिक्षित स्रिया किती प्रमाणात ठेवतात, सुशिक्षित स्त्रीया त्यांचा आदर्श ठेऊन वागत नसल्या तरी अशिक्षित स्रिया मोठ्या प्रमाणात आदर्श ठेऊन तसा वागतात, म्हणूनच त्या मुलगी,पत्नी आणि आईच्या भूमिकेतून शून्यातून विश्व निर्माण करून प्रेरणादायी, आदर्श स्त्रीया ठरतात.
   मुलीचे लग्न करण्यासाठी किती दिवस अगोदर मुलाचा शोध घ्यावा लागतो, जवळचे नातलगांना मित्रमंडळींना सांगून ठेवा लागते मुलीचे लग्न करायचे आहे, चांगला मुलगा असेल तर लक्षात ठेवा. नंतर सुरुवात होते मुलगी पाहण्याचा,प्रथम मुलगी पाहिल्यावर मुलाने मुलगी पसंत केली तर पुढची बोलणी सुरू होते.मुलीला मुलगा पसंत आहे की नाही त्यांचा पूर्ण अधिकार पूर्वी वडील,भाऊ,काका,मामा यांनाच असायचा मुलीला विचारले तर तिचे एकच उत्तर असायचे तुम्ही जो निर्णय घेतला तो मला मान्य असेल. किंवा तिच्या पसंतीचा प्रश्न येत नव्हता. वडीलधारी जो निर्णय घेतील तो मान्यच असला पाहिजे. कोणती ही मुलगी मुलांचे घरदार स्वतःच्या डोळ्याने पाहत नाही,ते घरातील भाऊ,काका, मामा हे पाहूनच मुलीला घर कसे आहे त्याबाबत सांगत असतात. मुलगी ते ऐकूनच लग्न करते आणि लग्न झाल्यावर प्रथम दिल्या घरी जाते. आणि जे आहे तेच स्वीकारते,तिथे तिची मूलगीची भूमिका संपते. आणि पत्नी,बायको च्या नवीन भूमिकेत प्रवेश करते.ती तिच्या यशस्वी जीवनाची सुरवात होते.


   पांच भावांची लाडकी बहीण जेव्हा खेडे सोडून भांडुपच्या मिलिंद नगर झोपडपट्टीत आठ बाय सहाच्या कारव्याच्या कुडाच्या घरात प्रवेश करते,तेव्हा तिच्या मनात व चेहऱ्यावर कोणतेही दुःख दिसत नाही ती सासु, सासरा व नवरा या तिघात चौथी तन मन धनाने एकरूप होते. ती कधीच विचार करीत नाही. माझे भाऊ कुठे राहतात. मी कुठे राहते. आज त्या माझा आईचा चंद्रकला सागर तायडे चा आम्हाला गर्व वाटतो.आता जे भी नातलग व ओळखीचे लोक भेटतात ते गुलाबराव हिवराळे डीघी, तालुका नांदुरा,जि- बुलढाणा यांच्या बहिणीने अपार कष्ट त्याग करून नांव काढले म्हणतात, मुलगी,पत्नी झाल्यावर ती आई होते, त्यावेळी तिने जे कष्ट केले त्यांचे फळ आज ती आई म्हणूनच सुखा समाधानाने खाते.
     मुलगी कोणाची पत्नी म्हणून जेव्हा येते तेव्हा तिची ओळख सासु सासरे,नवरा या कुटुंबाशी रक्ताच्या नात्याने जोडली जाते,असे म्हणतात की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतोच. प्रत्येक पुरुषाला वाटते की जी मुलगी (स्त्री) लग्न करून आपल्या घरी येईल ती भाग्यशाली असावी तिच्यामुळे आपले घर हे नंदनवन व्हावे त्याच बरोबर तिने आपल्या घराची व आपल्या कुटुंबाची चांगली काळजी घ्यावी व आपल्या आयुष्यात आनंदी आनंद निर्माण करावा. काही पुरुषांच्या बाबतीत हे खरे देखील होते व त्यांच्या घरात येणारी स्त्री खरोखरच आनंद व भाग्य घेऊनच घरात येते व घरातील संपूर्ण वातावरणात आनंद पसरवते. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म यात अशा स्त्रियांची पाच लक्षणे सांगितली आहेत की ज्या स्रियांमध्ये हे गुण असतात त्या स्त्रीला लग्न होऊन ज्या घरी जातात त्या घराला नंदनवन बनवितात. त्यांचे जिते जागते उदाहरण म्हणजे चंद्रकला सागर तायडे माझ्या आईचा संसार आहे.


   पहिला गुण म्हणजे मुलगी,पत्नी (स्त्री) म्हणून घरात येते आणि घरातील नकारात्मक विचार काढून सकारात्मक विचारांचे वातावरण निर्माण करते.अशा वातावरणात राहणारे कुटुंब सुखी व आनंदी होते. अनेक कुटुंबातील लोकांचे म्हणणे असते की मुलगा लग्न झाल्यावर सुधरील जबाबदारी काय असते ते बायको आल्यावरच त्याला बरोबर समजते.पण असे होतांना कुठे ही फारसं दिसत नाही.
   दुसरा गुण म्हणजे समाधानी वृत्ती! जी स्त्री अगदी छोट्या छोट्या गोष्टींवर समाधान मानते, जास्त हव्यास करीत नाही तिचा पती देखील तिच्या सोबत आनंदी असतो, काही स्त्रीया जर शेजारी काही वस्तू आली की आपल्या घरात ती यायलाच हवी असे वर्तन करतात. यामुळे त्याच्या इच्छा व मागण्या पूर्ण करता करता त्यांच्या पतीच्या नाकीनव येतात व कधी कधी त्यांच्या अवास्तव अपेक्षा पूर्ण करण्यासाठी पतीला वाईट कामे करावी लागतात. त्यात त्याला आपोआप गुंतवावे लागते व त्यामुळे त्याचे वाईट परिणाम संपूर्ण कुटुंबाला भोगावे लागतात, म्हणून जर स्त्री समाधानी असेल व तिच्या गरजा मर्यादित असतील तर त्या पूर्ण करताना पतीला देखील जास्त कष्ट करावे लागत नाही व घरातील वातावरण आनंदी व समाधानी राहते. नाक्यावर काम करून जेव्हा एखादा माणूस शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या प्रगती करतो. तेव्हा त्यात त्यांच्या पत्नीचा शंभर टक्के वाटा असतो. बाहेर माणूस किती ही हुशार असला तरी त्यांचे घरात व घरातील मुलावर लक्ष नसले की मुलं शिक्षण घेण्याकडे लक्ष कमी देतात व वाईट मार्गाला लागतात.पण माणसापेक्षा स्त्रीने मुलांवर लक्ष देऊन शिक्षण व संस्कार दिले तर मुलं कधीच वाईट मार्गाला लागत नाही, त्यांचे उत्तम उदाहरण म्हणजे आम्ही चार भावंड होत. बाबांनी कधीच घरात लक्ष दिले नाही, शाळेत कधीच शिक्षकांना भेटले नाही,कधी घरात रेशन धान्य,भाजीपाला आणला नाही,कधी स्वतः चाय बनवून पिले नाही,टाटा पॉवर कंपनीत नोकरी करत असतांना सुद्धा असंघटित नाका कामगारांना संघटित करण्यासाठी वेळ दिला,चळवळीसाठी वेळ होता. पण पत्नी,मुलासाठी २०१७ पर्यत कधीच वेळ दिला नाही,


   २०१७ ला मात्र आईला मावशी,बापूला सोबत घेऊन सारनाथ,लिबुनी,नेपाळ,वैशाली, नालंदा,बुद्धगया सर्व प्रसिद्ध स्थळांना भेटी दिल्या. २०१८ ला विनिश केदारे,ममता सरोदे यांच्या वर्ड टूर सोबत बँकॉक थायलंड च्या दहा प्रमुख प्रसिद्ध शहरातील स्थळांना भेटी देऊन सात दिवस सहा रात्र फिरून आले,२०१९ वर्ड टूर सोबत श्रीलंका आठ प्रमुख प्रसिद्ध शहरातील स्थळांना भेटी देऊन सात दिवस सहा रात्र फिरून आले. ३८ वर्षात कुठेही न नेणाऱ्या बाबांनी आईला बुद्धगया,बँकांक,श्रीलंका फिरून आणले त्यामुळे त्या दोघांना ही कष्ट,त्यागाचे समाधान लाभले.आयुष्यात कधी जे स्वप्न पाहिले नव्हते. ते साकार करून घेतले.हे त्यांच्या कुशल कामाचं फळ आहे.
    तिसरे लक्षण म्हणजे, स्त्री मध्ये धैर्य आणि धाडस असावे. कोणतीही परिस्थिती असली तरी देखील न डगमगता त्या परिस्थितीला सामोरे जाण्याची जिद्ध त्याग,कष्ट करण्याची तयारी स्त्रीमध्ये असावी लागते, तेव्हाच कितीही वाईट परिस्थिती असली तरी स्त्री भक्कम पणे आपल्या कुटुंबाच्या पाठीशी उभी राहली तर घरामध्ये आर्थिक सामाजिक जिव्हाळा निर्माण करणारी परिस्थिती तयार होयाला वेळ लागत नाही. कारव्याच्या घरात भाड्याने राहणारी मुलगी,पत्नी आणि आई आज चार चार घरांची मालकीण आहे.हे पाहिल्यावर तिच्या कष्टाची,त्यागाची आठवण झाल्या शिवाय राहत नाही, तर काही लोक फक्त मनातून म्हणतात “काय होतीस तू आणि काय झालीस तू”  पण बुद्ध म्हणतात कुशल कर्माचे फळ कधीही कशूलच असते.
    चौथे लक्षण म्हणजे राग न येणे तसे पाहायला गेले तर हा गुण असणाऱ्या स्त्रिया मिळणे अवघड आहे, कारण राग येणे हा स्त्रीचा जन्मताचाच स्वभाव असतो. परंतु अति राग करणे, चिडचिड करणे, कर्कश आवाजात बोलणे अशी लक्षणे स्त्रीमध्ये असू नयेत थोडा फार राग सर्वच स्त्रियांना येतो व तो यायलाच हवा त्या रागाचा आतल्या आत मोठा साठा होऊन कधीतरी त्याचा मोठा स्फोट होऊ शकतो. व त्याचे वाईट परिणाम होऊ शकतात. जर स्त्री सारखी राग राग करीत असेल किंवा चीड चीड करीत असेल तर त्या घरातील शांतता निघून जाते व भांडणे आणि वाद विवाद होत राहतात म्हणून स्त्रीने नेहमीच शांत असावे. तरच ती सासरला माहेरशी जोडण्याचे काम योग्य प्रकारे करू शकते.मुलगी पत्नी झालीच नाही तर?. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती किती चांगली असेल तर सुख,शांती घरात नांदत नाही. असे अनेक उदाहरणे आज समाजात दिसतात. जी स्त्री पत्नी होऊ शकत नाही, ती आई झाली तरी मुलांना आई सारखी वागणूक देईल काय?. समाजाला, नातलगांना ते शरीराने एकत्र राहतांना दिसतात पण मनाने एकत्र नसतात.अशी मुलगी पत्नी आणि आई बनली तरी ते सुखी समाधानी विश्व बनलेल्या कुटुंबाला शून्यात आणून ठेवते.
   पाचवे लक्षण म्हणजे समजदार स्त्री. जी स्त्री प्रत्येक गोष्टीत समजूतदार पणाने घेते व शांत पणे सर्व समजून घेते,जे आहे ते आहे, व जे नाही ते नाही,याचा शांतपणे विचार करून स्वीकार करते तसेच सर्वांशी चांगली वागते,गोड बोलते, त्यामुळे ते घर देखील सुखी व आनंदी असते,ज्या स्त्रीचे बोलणे गोड असते, ती सर्वांशी चांगले बोलून त्यांच्यातील संबंध अधिक चांगले बनवते आणि सर्वांना समजून घेते त्यामुळे वेळ प्रसंगी ते सर्व लोक तिच्या कुटुंबियांसाठी धावून येतात. माझी आई चंद्रकला सागर तायडे तिच्या २७ सप्टेंबर ६३ वाढदिवसाच्या निमित्ताने मी माझे मनोगत व्यक्त करतो.माझे बाबा मला नेहमीच लिहण्यास सांगतात, दुसऱ्यावर लिहता येत नसेल तर स्वतःच्या माणसांवर ज्यांच्यावर आपण प्रेम करते ज्यांना आदर्श म्हणतो ते आपल्या शब्दात मांडलेच पाहिजे. हे लिहण्यासाठी त्यांनी मला भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म,भाग चौथा,भगवान बुद्धांची प्रवचने गृहस्थांसाठी, 1) सुखी गृहस्थ, 2) पुत्रा पेक्षा कन्या बरी असु शकते,3) पती आणि पत्नी पान क्रमांक २५३ /२५४, भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म,भाग पाचवा, उपासकांसाठी जीवन नियम (विनय) पान क्रमांक ३०६ ते ३१२,हे वाचून काढण्यास सांगितली.ते वाचून मी हे मनोगत लिहले.मी थोडे शब्द बद्दलले पण त्यांचा अर्थ बदलले नाही,आज आई बाबा बरोबर भांडूप धम्म उपासिका संघाच्या प्रत्येक धम्म कार्यात सहभागी होत आल्यामुळे अनेक धम्म उपासिका संघटीत होत आहेत.म्हणूनच शून्यातून विश्व निर्माण करणारी मुलगी,पत्नी आणि आई मला दिसते. 


   सर्वात मोठे नातं कोणते असते?.तर ते विश्वासांचे ते परिसरात,नातलंगात आणि ज्याच्याशी आमचे कोणतेही जाती,धर्माचे नातं नाही तरी आम्ही रक्ताच्या नात्यासारखे अनेकांशी जोडल्या गेलो ते केवळ आईबाबांमुळे, म्हणूनच प्रत्येक स्त्रीयांनी मुलगी,पत्नी आणि आई ह्या भूमिका योग्य प्रकारे पारपाडल्या तर त्या शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या प्रेरणादायी आदर्श स्रिया ठरतात. एक मुलगी,पत्नी आणि आईच्या भूमिका कठीण परिस्थितीत कष्ट,त्याग करून पार पाडणाऱ्या माझा चंद्रकला सागर तायडे आईस ६३ व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
प्रशांत सागर तायडे,9833841309,भांडुप,मुंबई.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *