न्यू प्रगती शैक्षणिक संस्था कोपरी ठाणे आणि प्रणव खाडे निर्मित लेखक दिग्दर्शक आनंद खाडे बाप शॉट फिल्मचा शो प्रदर्शित झाला.

बातमी शेअर करा.

विशेष प्रतिनिधी ठाणे – बापाने किती ही संकटाचा सामना करून रात्रंदिवस मेहनत करून घर बांधून मुलाचे शिक्षण व लग्न केले तरी लग्न झाल्या नंतर मूल विचारतात तुम्ही आमच्या साठी काय केले?. नंतर त्यांची रवानगी वृद्धाश्रमात केली जाते.असा हा बाप लोकांसमोर उघड होऊन डोळ्यातून अश्रु काढू शकत नाही.त्यांच्या कष्टाची त्यागाची आणि जिद्धीने उभा केलेल्या संसाराची दखल कोणी घेत नाही.त्यावेळी नातलग व समाज त्याच्या मदतीला उभा राहत नाही.अशा ह्या बापाची शॉट फिल्म लेखक दिग्दर्शक आनंद खाडे यांनी बनवली आहे,तिचा खास शो दिनांक २६ मार्च २०२५ ला मंगला हायस्कूल कोपरी ठाणे येथे मान्यवरांच्या उपस्थित प्रदर्शित करण्यात आला.कुमारी अनीता दिनकर खरात संचालिका न्यू प्रगती शैक्षणिक संस्था कोपरी ठाणे यांच्या अध्यक्षते खाली प्रणव खाडे निर्मित लेखक दिग्दर्शक आनंद खाडे बाप शॉट फिल्मचा विशेष शो चे आयोजन करण्यात आले होते.बाप शॉट फिल्म मध्ये काम करणाऱ्या सर्व कला करांचे मान्यवरांच्या हस्ते शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.  

मान.देवेंद्र खाडे राज्यपालाचे उप सचिव (सेवानिवृत) मान.एस.पी. खाडे माजी डायरेक्टर एम.एम.आर.डी.ए,मान.कमलेश सावंत प्रसिद्ध अभिनेते,मान. जयराज नायर,या विशेष मान्यवरांच्या उपस्थितीत आणि श्रीमती सीमाताई पाटील समाज सेविका ठाणे,खंडूराज गायकवाड पत्रकार मंत्रालय,सागर तायडे पत्रकार कामगार नेते, सुधाकर बक्षी अध्यक्ष आदर्श संस्कार केंद्र ठाणे,महेंद्र देवळेकर चित्रपट डायरेक्टर, सुरेश भोसले नाट्य निर्माते,उदय आंजलेकर कॅमेरामन यांच्या उपस्थितीत बाल कलाकारासह सर्व बाप शॉट फिल्म मधील सर्व कलाकार कुटुंबासह मोठ्या संख्येने उपस्थित होते.प्रास्ताविक मिलिंद कांबळे यांनी केले तर उत्तम सूत्रसंचालन चंद्रकांत सोनवणे यांनी केले.प्रणव खाडे निर्मित लेखक दिग्दर्शक आनंद खाडे बाप शॉट फिल्म कुटुंबासह सर्वानी आवर्जून पाहावी असे मान्यवरांनी जाहीर आवाहन केले.

सागर तायडे यांस कडून 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *