‘स्कूल ठिक करो’ अभियान अंतर्गत जी.प.केंद्रीय मराठी शाळा बेलाड प.स.मलकापुर जि.बुलढाणा शाळे ला भेट.

बातमी शेअर करा.

विशेष प्रतिनिधी -काक्रोज जनता पार्टी संस्थापक अध्यक्ष अभिजित दिपके यांनी 15 ऑगस्ट पासून चालु केलेले राष्ट्रीय आंदोलन “स्कुल ठिक करो” या आंदोलनाच्या अंतर्गत जि.प. केद्रिय मराठी उच्च प्राथमिक शाळा बेलाड आज दिनांक 19/8/2026 बुधवार रोजी सहायक मुख्यध्यापक चव्हाण सर यांची ऑफ लाईन भेट घेऊन घेऊन सिजेपी (CJP) च्या माध्यमातून सरकारी शाळाचे ऑडिट होत असल्याचे माहिती दिली मी गावातील नागरिक असल्याच्या नात्याने मी या आंदोलनाचा भाग म्हणून आपल्या सोबत आज ऑफ लाईन चर्चा करण्यासाठी आलो आहे अशी चव्हाण सर ला माहिती दिली. यावेळी माजी सरपंच आजाबराव संबारे उपस्थित होते ह्या वेळी सर्व शाळेची पाहणी केली असता शाळेचे आरो मशीन नादुरुस्त आहे व ते धुळखात एका मोडकळीस असलेल्या रूम पडलेले दिसले.नळ योजनेव्दारे पिण्याच्या पाण्याची टाकी पाहयाला मिळाली परंतु टाकी वरील लाकडी झाकण टुटलेल्या फुटलेल्या अवस्थेत पाहयाला मिळाले व टाकीचे विद्यार्थी चे पाणी पिण्याचे नळ टुटलेले आढळले. 

   वर्ग ७ व मुख्याध्यापक कार्यालयावरील पत्रे फुटलेल्या अवस्थेत पाहयाला मिळाले. यावेळी विद्यार्थ्यांनी पावसाळ्याचे पाणी आत मध्ये येत असल्याचे सांगितले. पावसाळ्याचे पाणी वर्गात येत असल्यामुळे विद्यार्थ्याना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. संडास बाथरुम ची दयनिय व्यवस्था येथे पाहायला मिळाली या शाळेला पांच महिला शिक्षिका व २ पुरुष शिक्षक असुन 1 मुख्याध्यापक पद हे रिक्त आहेत ते पद शासनाने लवकरात लवकर भरावे. यावेळी संडास बाथरुम वर पाण्याची टाकी नसल्याने त्या परीसराला  दुर्गंध सुटला आहे येथे विद्यार्थीणी विद्यार्थी सोबत महिला शिक्षिकांना ही या त्रासाला सामोरे जावे लागत आहे असे दिसून आले आहे पाहाणी दरम्यान वर्ग १ व वर्ग ५ एकत्र मिळून एक वर्ग भरविण्याचे निर्देशनास आले दोन्ही वर्ग एकत्र का विचारणा केली असता वर्ग ५ शिक्षक ट्रेनिंग ला गेले आहे म्हणून असे करावे लागते असे सांगण्यात आले शाळ्याच्या प्रवेशद्वार समोरील शाळा जिर्ण अव्यस्थेत उभी आहे ती कोणत्याही वेळी पडु शकते त्यामुळे शाळेत मोठी जीव हांणी होण्याची शक्यता नाकारता येत नाही शाळेला मैदान नसल्यामुळे क्रिडा क्षेत्रातील ज्ञानाला येथील विद्यार्थ्याना मुकावे लागत आहे. शाळेत लाईट आहे व सर्वच वर्गात पंखे व सीसीटीव्ही कमरे आहेत. आज मात्र विद्यार्थाना खिचडी किंवा इतर खाऊ मिळाला नाही या बाबत विचारणा केली असता स्टाक संपला आहे असे सांगितले आहे शाळे ला लागुन असलेल्या नदीवरील पूल संपूर्ण टुटलेला आहे दर वर्षी त्यामध्ये मुरूम घालून वेळ मारून नेली जात आहे शाळेतील समस्या समंधी आजाबराव संबारे यांनी सरपंच यांना फोन लावला असता ते तालुका ला गेले होते त्यांच्या सोबत भ्रमणध्वनी मी बोललो असता जुनी इमारत पाडण्याचे पत्र ग्रामपंचायत प्रशासनाला प्राप्त झाले आहे लवकरच पाडण्याचे काम करणार असे सांगितले मुत्रीघर संडास वर दो दिवसांत पाण्याची टाकी बसविण्याची व्यवस्था करतो असे सांगितले वर्ग ७ व कार्यालयाचे पत्राचे काम पंधरा दिवसात केले जाईल असे सांगितले शाळा समोरील ग्रामपंचायत इमारत ही आरसीसी ची इमारत आहे गांवात चार अंगणवाडी ह्या सुध्दा आरसीसी मध्ये बनविल्या गेल्या आहेत स्वातंत्र्य ला ८० वर्ष झाली पण सरकारी शाळा आज ही टिनपत्राची आहे. असल्यामुळे संजय इंगळे यांनी नाराजी व्यक्त केली.
      शासन प्रशासन दिलेल्या वेळेत शाळेला सर्व सुविधा पुरविण्यात याव्या अनथा सिजेपी CJP ग्रामस्थ व विद्यार्थ्यांच्या वतीने लोकशाही मार्गाने आंदोलन केले जाईल.असे संजय इंगळे यांनी मुख्याध्यापक यांना सांगितले.
 
 संजय इंगळे९०१११७३५०८बेलाड यांस काडून

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *